मोनालिसा या व्हीडिओमध्ये एका हिरव्यागार प्रदेशात 'ऐसी दिवानगी' या गाण्यावर डान्स करते आहे. यादरम्यानच तिच्या पतीचीही (Husband) एंट्री होते. व्हीडिओमध्ये डान्सची शैली कमालीची मोहक आहे. तिचे एक्स्प्रेशन्स आणि डान्सच्या स्टेप्स यांच्यावर नजर खिळून राहते. या अभिनेत्रीनं व्हीडिओ शेअर करताना लिहिलं आहे, 'दिवाने हम फुल फिल्मी...' या व्हीडिओवर चाहते खूप भरभरून कमेंट्स करतात. पतीसोबत तिच्या केमिस्ट्रीचंही खूप कौतुक होताना दिसतं आहे. अर्थात, ही काय पहिली वेळ नाही. आजवर अनेकदा तिच्या डान्सनं लोकांची मनं जिंकलीत. मोनालिसाच्या कामाबाबत बोलायचं तर एका मोठ्या वृत्तवाहिनीवर सुरू झालेल्या 'नमक इस्क' या मालिकेत ती दिसते आहे. भोजपुरी सिनेमासह बॉलिवूडमध्येही तिनं आता आपला ठसा उमटवला आहे. मोनालिसा 'सरकार राज', 'मनी है तो हनी है', 'गंगा पुत्र', 'काफिला' अशा अनेक बॉलिवूड सिनेमामध्ये काम केलं आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instagram, Shahrukh khan, Viral video.