मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी आकांक्षानं 'या' अभिनेत्रीला केला होता मेसेज, विचारला होता 'हा' प्रश्न

टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी आकांक्षानं 'या' अभिनेत्रीला केला होता मेसेज, विचारला होता 'हा' प्रश्न

टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी आकांक्षनं या अभिनेत्रीला केला होता मेसेज

टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी आकांक्षनं या अभिनेत्रीला केला होता मेसेज

भोजपूरी अभिनेत्री आकांक्षा दुबेनं गळफास घेऊन आयुष्य संपवलं. या घटनेनंतर सगळीकडं खळबळ माजली आहे. असं पाऊलं उचलण्यापूर्वी तिनं एका भोजपूरी अभिनेत्रीला मेसेज केला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 27 मार्च-Akanksha Dubey Death: भोजपूरी अभिनेत्री आकांक्षा दुबेनं(Actress Aakanksha Dubey) रविवारी सकाळी वारणसीमध्ये एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. तिनं असं टोकचं पाऊल उचल्यानंतर तिच्या चाहत्यांना आणि मित्र मंडळींला मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर एक दिवसापूर्वी आकांक्षानं तिचा डान्स करत असतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. तिचा असा हसता खेळता व्हिडिओ पाहून चाहत्यांना वाटलं नव्हतं की आकांक्षा अशाप्रकारे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेईल. तिनं गळफास घेत आयुष्य संपवलं आहे, असं करण्यापूर्वी आकांक्षा इन्स्टावर लाईव्ह देखील आली होती. या व्हिडिओत ती ढसाढसा रडत होती. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून चाहते म्हणत आहेत की, आकांक्षाला आयुष्य संपवायचे नव्हते मात्र तिला कसला तरी त्रास नक्की होता. मरण्याच्या आधी तिनं अभिनेत्री अक्षरा सिंहला मेसेज देखील केला होता. याचा खुलासा खुद अक्षरा सिंहनं देखील केला आहे.

अक्षरा सिंहला नेमक काय केला होता मेसेज?

अक्षरा सिंहने आकांक्षा संबंधी एक पोस्ट शेअर केली आहे. तिनं म्हटलं आहे की, काय लिहायचं काय समजतचं नाही. काल तुझा मेसेज आला होता, कुठे आहेस दीदी वाराणसीत काय ? मला तर विश्वासच बसत नाही..एक धाडसी मुलगी जिनं आपल्या आई वडिलांना एक चांगलं आयुष्य देण्याचा विचार केला होता. मुलींनो अजून वेळ गेलेली नाही असं करण्यापूर्वी एकदा आई-वडिलांचा विचार करा.

वाचा-Video : जीवन संपवण्यापूर्वी आकांक्षा दुबेने केलेलं इन्स्टा लाईव्ह, ढसाढसा रडण्याचं काय होतं कारण?

अक्षराची पोस्ट पाहून चाहते देखील यावर प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी म्हटलं आहे की, बहुतेक तिला तुमच्यासोबत काही तरी शेअर करायचं असणार. त्यामुळचं आकाक्षानं तुम्हाला मेसेज केला असणार. तर एकानं म्हटलं आहे की, तुम्हची आठवण तिला का आली..तिच्या मृत्यूमागं कोणाचा हात आहे...तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का? असा प्रश्न एका चाहत्याने केला आहे.

मृत्यूच्या 23 तासापूर्वी केली होती ही शायरी पोस्ट

आकांक्षा दुबेने मृत्यूच्या 23 तासापूर्वी तिच्या इन्स्टा स्टोरीला एक शायरी पोस्ट केली होती. यामध्ये असं म्हटलं आहे की, राह देखेंगे तेरी चाहे जमाना लग जाए,या तो आ जाए तू या हम ही ठिकाने लग जाए...अशाप्रकारची शायरी तिनं पोस्ट केली होती.

आकांक्षा दुबे तीन वर्षाची असताना आपल्या आई वडिलांसोबत मुंबईत शिफ्ट झाली होती. तिच्या आई- वडिलांचं तिला आयपीएस करण्याचं स्वप्न होत. मात्र तिला बालपणापासून नृत्याची व अभिनयाची आवड होती. शिवाय तिला टीव्ही पाहायला देखील आवडत होतं. तिची हिच आवड ओळखून ती सिनेमा इंडस्ट्रीत आली. मुंबईत शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिनं तिच्या फिल्मी करिअरला सुरूवात केली. यासाठी तिला तिची मैत्रीण पुष्पांजली पांडेनं मदत केली.

मिळालेल्या माहितीनुसार, 17 व्या वर्षी आकांक्षा दुबेनं भोजपूरी सिनेमात पहिलं पाऊल ठेवलं. तिनं दिग्दर्शक आशी तिवारीसोबत काही सिनेमात काम केलं आहे. असं जरी असलं तरी तिला अनेकवेळा रिजेक्शनचा सामना करावा लागला आहे. आकांशा 2018 मध्ये डिप्रेशनमध्ये गेल्याचं देखील सांगितलं जात आहे. यानंतर तिनं काही काळ सिनेमापासून लांब राहणं पसंद केलं.

First published:
top videos

    Tags: Bollywood News, Entertainment