मुंबई, 30 मार्च: काही दिवसांपूर्वी भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या मृत्यूनंतर सगळीकडे खळबळ माजली होती. तिने एवढं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण मात्र अद्याप समोर आलं नव्हतं. आता भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला असून त्यात मृत्यूचे कारण समोर आले आहे. आकांक्षा दुबे हिने वाराणसीतील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप आहे, त्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. तेव्हापासून पोलीस या अहवालाची वाट पाहत होते, जो आता आला आहे. आकांक्षा दुबेची हत्या झाली नसल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून स्पष्ट झाले आहे.
आकांक्षा दुबेच्या आईने अभिनेत्रीचा प्रियकर समर सिंह याच्यावर हत्येचा आरोप केला होता आणि आकांक्षाकडून 5 कोटी रुपये उसने घेतल्याचा दावा केला होता. समर सिंह आपल्या मुलीला वारंवार धमकावत असल्याचा आरोप आकांक्षाच्या आईने केला होता. नातेवाइकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी समर सिंहविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. शवविच्छेदन अहवालात हत्येची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी समर सिंह यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
पत्रकारासोबत गैरवर्तन केल्या प्रकरणी सलमान विषयी मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय; काय आहे प्रकरण ?
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आकांक्षा दुबेचा मृत्यू फाशीमुळे झाल्याचे समोर आले आहे. आकांक्षाच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमेच्या खुणा नाहीत. यावरून आकांक्षा दुबेची हत्या झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अभिनेत्रीच्या मृत्यूमागे समर सिंहचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असली तरी. आकांक्षा दुबे आणि समर सिंह लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते आणि एकाच घरात राहत होते, असे पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात समोर आले आहे. दोघे वाराणसीच्या तक्तकपूर येथील घरात एकत्र राहत होते.
'आज तक'च्या वृत्तानुसार, पोलिसांना शंका आहे की आकांक्षा दुबे आणि समर सिंह यांचे ब्रेकअप झाले असावे, त्यानंतर अभिनेत्री स्वतःला सांभाळू शकली नसावी आणि डिप्रेशनमध्ये गेली असावी. नैराश्यातून आकांक्षाने आत्महत्येसारखे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पण सध्या ठोसपणे काहीही सांगणे कठीण आहे. समर सिंग आता पोलिसांच्या रडारवर आहे. आत्महत्येच्या रात्री समरसोबत आकांक्षा एका पार्टीत सहभागी झाली होती. आता समर सिंगला पकडण्यासाठी अनेक पोलिस पथके रवाना झाली आहेत.
पण अज्ञात व्यक्तीमुळे म्हणा किंवा मिस्ट्री मॅन म्हणा, आकांक्षा दुबेच्या मृत्यूचे प्रकरण गुंतागुंतीचे होत चालले आहे. असे सांगितले जात आहे की, ज्या दिवशी (26 मार्च) आकांक्षा दुबेने आत्महत्या केली, त्या दिवशी पहाटे 2 वाजता एक व्यक्ती अभिनेत्रीला हॉटेलमध्ये सोडण्यासाठी आला आणि 17 मिनिटे तिथे थांबला. पण ही व्यक्ती कोण होती आणि तो तिथे का आला होता आणि इतका वेळ का राहिला? आकांक्षा दुबेशी त्याचे काय नाते होते? हे समोर आलं नसून पोलिसही आता त्याचा तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Entertainment