Home /News /entertainment /

... म्हणून पहिल्या घटस्फोटानंतर 8 वर्षांनी मनोज तिवारींनी केलं दुसरं लग्न; कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?

... म्हणून पहिल्या घटस्फोटानंतर 8 वर्षांनी मनोज तिवारींनी केलं दुसरं लग्न; कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?

राणी यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर भोजपुरी अभिनेता मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांनी तब्बल 8 वर्षानंतर दुसरं लग्न केलं.

  नवी दिल्ली, 04 जानेवारी: भोजपुरी अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणारे मनोज तिवारी वयाच्या 50 व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाले आहेत. 31 डिसेंबरच्या दिवशी मनोज तिवारींनी (Manoj Tiwari) ही आनंदाची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली. मनोज तिवारींची दुसरी पत्नी सुरभि यांनी गोजिऱ्या मुलीला जन्म दिला आहे. राणी यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर मनोज तिवारींनी तब्बल 8 वर्षांनी दुसरं लग्न केलं. राणी यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर मनोज तिवारींची दुसऱ्यांदा लग्न करण्याची इच्छा नव्हती परंतु त्यांची पहिली मुलगी जिया हिने तिवारींना लग्न करण्याचा आग्रह केला. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मनोज तिवारी म्हणाले होते, ‘माझ्या घटस्फोटाला आता 10 वर्ष उलटून गेली आहेत. पण अजूनही माझ्या आणि राणीच्या नात्यात कटूता आलेली नाही ती सध्या मुंबईत असते.’
  मनोज तिवारींचं दुसरं लग्न एप्रिल 2020 मध्ये झालं होतं. सुरभि तिवारी उत्तम गायिका आहेत. भोजपुरी चित्रपटात त्यांनी अनेक गाणी ऐकायला मिळतात. सुरभि यांचा जन्म खरं तर बिहारमधील पटना इथं झाला होतं. त्यांचं शिक्षणदेखील पटण्यातच झालेलं आहे. मनोज तिवारी लवकरच दुसऱ्या मुलीचं बारसं करणार आहेत. भोजपुरी इंडस्ट्रीतले सुपरस्टार मनोज तिवारी यांच्या नावावर अनेक सुपरहिट चित्रपट आहेत. 'ससुराल बडा पैसावाला' या चित्रपटातून त्यांनी डेब्यू केला. त्यानंतर धरती काहे पुकार के, भोले शंकर, जनम जनम के साथ, ऐलान, अंधा अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Marriage

  पुढील बातम्या