फिल्म रिव्ह्यु : 'भेटली तू पुन्हा'

फिल्म रिव्ह्यु : 'भेटली तू पुन्हा'

'भेटली तू पुन्हा' सिनेमाचं नावंच जरा घोळ करतं नाही, म्हणजे भेटलीस तू पुन्हा किंवा भेटली ती पुन्हा असं का नाही असा विचार नक्कीच मनात येतो.

  • Share this:

चित्राली चोगले, प्रतिनिधी

'भेटली तू पुन्हा' सिनेमाचं नावंच जरा घोळ करतं नाही, म्हणजे भेटलीस तू पुन्हा किंवा भेटली ती पुन्हा असं का नाही असा विचार नक्कीच मनात येतो. पण शेक्सपिअर म्हणून गेले आहेत की नावात काय आहे आणि हा नियम अशा वेळी लक्षात ठेवावा. तर सिनेमा रोमँटिक सफर घडवणारा असा असल्याचं लक्षात येतं ना येतं, सिनेमात आपण गुंतत जातो ना जातो सिनेमा थोडा भरकटतो आणि आपण सिनेमातून बाहेर येतो.

काय आहे स्टोरी ?

अलोक भावे म्हणजे वैभव तत्ववादी आणि अश्विनी सारंग म्हणजे पूजा सावंत यांची ही लव्हस्टोरी सुरू होते तीच एका वेगळ्या नोटवर. कांदे पोह्यांचा कार्यक्रम 34 वेळा झालेला अलोक अश्विनीला पहायला येतो आणि काहीश घाबरलेली-धांडरट अश्विनी त्याला पसंत पडत नाही. तो तिला साफ नकार देतो आणि 35वी मुलगी त्याच्याकडून नकार मिळवते. यानंतर हे दोघं पुन्हा एकमेकांसमोर येतात ते एका प्रवासा दरम्यान. पुणे-गोवा प्रवास आणि हे दोघं एकाच कम्पार्टमेन्टमध्ये, सुखद योगायोग घडून येतो आणि ती त्याला पुन्हा भेटते. नव्याने एकमेकांना हे दोघं कळतात आणि हलकी फुलक लव्हस्टोरी बहरु लागते नकळतंच. मराठीतला 'जब वी मेट' पाहतोय असं वाटू लागतं आणि सिनेमाचा पहिला भाग चांगला रंगू लागतो. पण सिनेमाचा दुसरा भाग मात्र ताणला जातो. सीन मागे सीन आणि प्रसंग सिनेमात येतात आणि हा प्रवास उगाच आपण करतोय का असं आपल्या आपसूकंच वाटू लागलं.  तेवढा सिनेमा ठेवला असता तर तो अधिक रंजक ठरला असता असंही वाटू लागतं. आणि शेवटी सिनेमात एक फिल्मी ट्विस्ट आहेच. सिनेमातले ड्रीम सिक्वेन्स दिग्दर्शक चंद्रकांत कणसेनं चांगेल हाताळले आहेत..त्यातले ट्विस्ट ही चांगले आहेत.त्यामुळे अगदीच सिनेमा पसरलाय असं नाही म्हणता येणार.

नवीन काय ?

सिनेमाचं टेकिंग तसं नवीन आहे. कथा थोडी वेगळी आहे. अगदी थोडीच हा. सिनेमातले ड्रिम सिक्वेन्स काहीसे वेगळे वाटतात कारण त्यात थोडेफार ट्विस्ट दिले गेलेत.

सिनेमा का पहावा ?

एका हलक्या फुलक्या रोमॅन्टिक राईडसाठी पहावा. पण तो पहिल्या भागापर्यंत मर्यादीत रहातो. सिनेमातल्या उत्तम सिनेमॅटोग्रफी, सुंदर नयरम्य दृष्यांसाठी पहावा. तर सिनेमात वैभवचं काम चांगलं झालय. पूजाने ही प्रयत्न केलाय पण थोडा कमी पडतो. तरीही या दोघांच्या केमिस्ट्रीसाठी बघायला हरकत नाही.

रेटिंग : अडीच स्टार्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2017 05:54 PM IST

ताज्या बातम्या