Video : राॅकिंग भाऊ कदम पाहिलेत का?

Video : राॅकिंग भाऊ कदम पाहिलेत का?

नशीबवानच्या ट्रेलरवरून तरी या चित्रपटात काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार, असं दिसतंय. कुटुंबवत्सल भाऊ कदम सफाई कर्मचारी असून सर्वसामान्य आयुष्य जगताना दिसत आहेत.

  • Share this:

मुंबई, 9 डिसेंबर : 'कॉमेडीकिंग' भाऊ कदम यांच्या 'नशीबवान'चं पोस्टर लाँच झालं तेव्हापासूनच प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती, की या चित्रपटात नक्की काय पाहायला मिळणार...?  ही प्रतीक्षा अखेर संपली. 'नशीबवान' चा जबरदस्त ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे.

ट्रेलरवरून तरी या चित्रपटात काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार, असं दिसतंय.  कुटुंबवत्सल भाऊ कदम सफाई कर्मचारी असून सर्वसामान्य आयुष्य जगताना दिसत आहेत. अचानक त्यांच्या आयुष्यात असं काहीतरी घडतं आणि त्याचं नशीबच पालटून जातं. भौतिक सुखाचा आनंद उपभोगत असतानाच त्यांच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडतानाही या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. भाऊ कदम यांच्या अफलातून अभिनयासोबतच, त्यांचे  खुसखुशीत विनोदही प्रेक्षकांना खदखदून हसवणारे आहेत.

या चित्रपटामध्ये  भाऊ सफाई कर्मचाऱ्याची भूमिका साकारत आहेत. ही भूमिका खरी वाटावी, म्हणून भाऊ यांनी खरोखरच कचरा उचलून साफसफाई केली आहे. यात दिग्दर्शकाने कोणत्याही प्रकारची तडजोड न करता सफाई कामगार उचलतात तोच कचरा भाऊंना उचलण्यास सांगितलं, तसंच सार्वजनिक स्वछतागृहाची सफाई देखील करायला लावली.

या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण हे मुलुंड परिसरात झालं आहे. आपल्या भूमिकेविषयी भाऊ कदम म्हणाले, की या चित्रपटाच्या निमित्ताने मी सफाई कामगाराच्या समस्या अगदी जवळून पाहिल्या, त्यांना होणारे आजार, समाजाकडून त्याची होणारी हेटाळणी हे सर्व बघताना स्वतःचा तिरस्कार वाटायला लागला.  कारण आपण निरोगी आरोग्य जगावं, आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहावा, यासाठी हे लोक घाणीमध्ये काम करतात. आपला कचरा उचलतात. खरंच खूप ग्रेट आहेत हे लोक. रात्रंदिवस झटणारे हे कामगार माझ्यासाठी खरे हिरो ठरले आणि माझ्या मनात त्यांच्याबद्दल शब्दांत व्यक्त होऊ न शकणारा आदर  निर्माण झाला.

चित्रपटाचे चित्रीकरण रहदारीच्या ठिकाणी केल्यामुळे हा चित्रपट अतिशय वास्तववादी वाटतोय. शिवाय या चित्रपटात कलाकारांना अतिशय नैसर्गिक रूपात दाखवण्यात आलं आहे, त्यांना मेकअपही केलेला नाही. कुठेही दिखाऊपणा, झगमगाट न दाखवता अतिशय सरळ पद्धतीनं या चित्रपटाची मांडणी केली आहे. भाऊ कदम यांच्यासोबत मिताली जगताप वराडकर आणि नेहा जोशी यांसारख्या दमदार अभिनेत्री या चित्रपटात आहेत. या जबरदस्त ट्रेलरवरून चित्रपटही एकदम झकास असेल यात शंका नाही.

फ्लाईंग गॉड फिल्म्स आणि गिरी मीडिया फॅक्टरी यांची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या ११ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.

Video : लग्नानंतरही आशियात सर्वात ‘सेक्सी’ दीपिकाच, प्रियांका चोप्राला टाकलं मागे

First Published: Dec 9, 2018 10:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading