VIDEO : भाऊ कदमांचा लव्ह ट्रँगल, मिताली की नेहा?

VIDEO : भाऊ कदमांचा लव्ह ट्रँगल, मिताली की नेहा?

नशीबवान सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. भाऊ कदम, मिताली जगताप आणि नेहा जोशी असे तिघं या सिनेमात आहेत.

  • Share this:

मुंबई, 02 जानेवारी : 'चला हवा येऊ द्या'मुळे भाऊ कदम लोकप्रिय झाले. घराघरात पोचले. पण आता ते नशीबवानही ठरलेत. येत्या 11 जानेवारीला त्यांचा सिनेमा रिलीज होतोय.

भाऊ कदम यांच्या  'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झालं आहे. एक सामान्य माणूस आपल्या बायको, मुलांना घेऊन जेव्हा प्रथमच बाहेर फिरायला निघतो तेव्हा तो  मॉलमध्ये जातो. आजच्या काळात महत्त्वाची ठरत असलेल्या मॉल संस्कृतीत तो जेव्हा फिरतो, तेव्हा त्याला आणि त्याच्या कुटुंबाला 'मॉलचं' खूप अप्रूप वाटतं. संपूर्ण मॉल बघताना त्याच्या नजरेत असलेली  उत्सुकता आणि आनंद आपल्याला गाणं पाहताना जाणवते. सामान्य माणूस पैशाअभावी जो आनंद स्वतः घेऊ शकत नाही आणि परिवाराला देऊ शकत नाही, तो आनंद  पैसे मिळाल्यामुळे कुटुंबाला देण्याचा प्रयत्न भाऊ कदम या गाण्यात करताना दिसत आहे.

छान तयार होऊन आजूबाजूच्या लोकांना आनंदाने जोरात सांगत भाऊ आणि त्यांचं कुटुंब बाहेर फिरायला जातात. मॉल फिरून झाल्यानंतर  मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन जेवताना भाऊ कदम आणि परिवार दिसत आहे. या गाण्यात दिग्दर्शकाने अगदी छोट्या छोट्या गोष्टी टिपल्या आहेत. जसे मॉलमध्ये टॉयट्रेनमध्ये बसल्यावर मुलांना सांभाळून नीट बसवताना वाटणारी भीती, हॉटेलमध्ये वेटरकडून जेवण वाढून घेताना होणारी अस्वस्थता, जेवण झाल्यावर टिशू पेपरमध्ये खडीसाखर बांधून घेणं.

गाण्याला आवाज आहे श्याल्मली खोलगडेचा. सोहम पाठकचं संगीत आहे.

या चित्रपटात मिताली जगताप आणि नेहा जोशी दोघींच्या भाऊंसोबत भूमिका आहेत. मिताली जगताप त्यांची बायको आहे, तर नेहा त्यांना नंतर भेटते. त्यांच्यातही नाजुक बंध निर्माण झाल्याचं गाण्यात जाणवते. एक सफाई कामगार पैसे मिळाल्यावर त्याचं आयुष्य कसं बदलतं, हे भाऊंनी उभं केलंय.

First published: January 2, 2019, 2:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading