भाऊ कदमांनी संजय मोनेंना सांगितला भन्नाट किस्सा

भाऊ कदमांनी संजय मोनेंना सांगितला भन्नाट किस्सा

कानाला खडा या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात भाऊ कदम संजय मोने यांच्याशी गप्पा मारायला येणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 28 नोव्हेंबर : गेल्या काही दिवसांपासून संजय मोने यांच्या कानाच्या खडा या आगामी चॅट शोची सर्वत्र चर्चा आहे. या कार्यक्रमात संजय मोने कलाकारांशी गप्पा मारणार आहेत. कानाला खडा लावणारे काही किस्से या गप्पांमध्ये रंगणार आहेत. हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ३० नोव्हेंबरपासून शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता प्रसारित होणार आहे.


या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात भाऊ कदम संजय मोने यांच्याशी गप्पा मारायला येणार आहेत.


'चला हवा येऊ द्या'मधून जगभरात प्रेक्षकांच्या घर घरात पोहोचलेला एक अवलिया विनोदवीर म्हणजे भाऊ कदम. सगळ्यांचा आवडता कलाकार भाऊ याचे किस्से देखील तितकेच भन्नाट आहेत. संजय मोने यांच्यासोबत गप्पा मारताना भाऊ कदम यांनी त्यांच्या बालपणीचा असा एक किस्सा सांगितला त्यानंतर भाऊने कानाला खडा लावला आणि ती गोष्ट परत न करण्याचा निर्णय घेतला.


भाऊ कदम शाळेत असताना शाळा बुडवून चित्रपट पाहायला जात असे. पण एके दिवशी त्याच्या बाबांना ही गोष्ट कळली आणि त्यानंतर काय घडलं हे प्रेक्षकांना पाहता येईल कानाला खडा या कार्यक्रमाच्या पहिला भागात.


तसंच शनिवारच्या भागात तरुणांच्या हृदयाची धडकन सई ताम्हणकर येणार आहे. तिचे कानाला खडे लावणारे किस्से देखील प्रेक्षकांना ऐकताना मजा येईल. आता अनेक कलाकारांनी कानाला खडा कधी लावला हे काढून घेणार संजय मोने.


पूर्वी अवधूत गुप्तेचा खुपते तिथे गुप्ते हा शो असाच मुलाखतींचा होता. आता कानाला खडामध्ये संजय मोने स्टाइल पाहायला मिळेल.VIDEO : आदेश भाऊजींच्या लेकानं केलं सेलिब्रेशन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2018 06:19 PM IST

ताज्या बातम्या