मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आलिया-रणबीरच्या लग्नानंतर भट्ट-कपूर कुटुंबाचा नवा PHOTO आला समोर, फोटोतून पूजा भट्ट गायब

आलिया-रणबीरच्या लग्नानंतर भट्ट-कपूर कुटुंबाचा नवा PHOTO आला समोर, फोटोतून पूजा भट्ट गायब

 नुकतंच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचं लग्न   (Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding)  पार पडलं. आलिया आता कपूर कुटुंबाची सून बनली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 16 एप्रिल-  नुकतंच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचं लग्न   (Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding)  पार पडलं. आलिया आता कपूर कुटुंबाची सून बनली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत.यामध्ये वधू वरासह कुटुंबातील लोक धम्माल करताना दिसून येत आहेत. आलियाची सासू म्हणजेच नीतू कपूर आणि रणबीरची सासू म्हणजेच सोनी राजदान या दोघीही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. आपल्या मुलांच्या लग्नानंतर त्यांनी सोशल मीडियावर भट्ट आणि कपूर कुटुंबाचा  (Bhatt & Kapoor Family)   एक फोटो शेअर केला आहे, जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बॉलिवूडमधील सर्वात चर्चित कपल्सपैकी एक असणारे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नुकतंच लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्या दोघांनी आपल्या लग्नाची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नव्हती. त्यामुळे सर्वांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. मात्र लग्नाच्या आदल्या दिवशी नीतू कपूर यांनी खुलासा करत लग्न १४ तारखेला असल्याचं सांगितलं होतं. लग्नानंतर या दोघांचे अनेक फोटो समोर आले आहेत.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाचे नवीन फोटो पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत. नीतू कपूर आणि सोनी राजदान या दोघींनीही या लग्नाचा सर्वात खास फोटो शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. नीतू आणि सोनीने भट्ट-कपूर कुटुंबाचा एक ग्रुप फोटो शेअर केला आहे.

आलियाची आई सोनी राजदान यांनी हा फोटो सर्वप्रथम सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी शुक्रवारी रात्री उशिरा हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आलिया आणि रणबीर सोनी राजदान, महेश भट्ट, आलियाची बहीण शाहीन भट्ट, रणबीरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी, रणबीरचा मेहुणा भरत साहनी आणि आई नीतू कपूर सर्वजण सोबत दिसत आहेत. फोटोसोबत, सोनी राजदान यांनी कॅप्शन देत लिहिलंय - 'सुखी कुटुंबापेक्षा मोठं दुसरं कुटुंब नाही'. या फोटोची आणि कॅप्शनची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

दरम्यान हा फोटो पाहून आणखी एका गोष्टीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. भट्ट आणि कपूर कुटुंबाचा हा फॅमिली फोटो खूप व्हायरल होत आहे. पण सोशल मीडिया यूजर्स पूजा भट्ट आणि तिचा भाऊ राहुल भट्ट या फोटोतून गायब असल्याबद्दल प्रश्न विचारत आहेत. ते या फोटोमध्ये का नाहीत? त्याचबरोबर रणबीरच्या कुटुंबातील लोक ऋषी कपूर यांना मिस करत आहेत.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Ranbir kapoor