भारती सिंगला का व्हायचं नाही आई? सांगितलं बाळाला जन्म न देण्याचं कारण

भारती सिंगला का व्हायचं नाही आई? सांगितलं बाळाला जन्म न देण्याचं कारण

...त्यामुळं मी आणि माझे पती हर्ष लिंबाचिया बाळाला जन्म देण्याचा निर्णयच घेऊ शकलो नाही,असं सांगत भारतीला या शोमध्ये अश्रू आवरले नाहीत.

  • Share this:

मुंबई 3 मे: प्रसिध्द अॅंकर आणि स्टॅण्डअप कॉमेडीयन भारती सिंग (Bharti Singh) अनेक गोष्टीं साठी सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असते. विनोदाच्या शैलीमुळे तिच्या फॅन्सची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सोशल मीडियावर (Social Media) ती खूप अॅक्टिव्ह असते. सध्या ती डान्स दिवाने (Dance Deewane) हा रिअलिटी शो होस्ट करीत आहे. या शोच्या एका एपिसोडमध्ये काही क्षण ती फारच भावनिक झालेली दिसली. कोरोनाच्या (Corona) कहरामुळे मी आणि माझे पती हर्ष लिंबाचिया बाळाला जन्म देण्याचा निर्णयच घेऊ शकलो नाही,असं सांगत भारतीला या शोमध्ये अश्रू आवरले नाहीत.

डान्स दिवाने या रिअलिटी शोच्या सेटवर भारतीने नुकत्याच आपल्या भावना शेअर केल्या. ती म्हणाली, की गेल्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मी आणि माझा पती हर्ष लिंबाचिया बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेऊ शकलो नाही. हा निर्णय आम्हाला पुढे ढकलावा लागला. डान्स दिवाने या रिअलिटी शोमध्ये एका स्पर्धकाने 14 दिवसांच्या बाळाचा कोरोनामुळे (Corona) मृत्यू होतो,आणि त्या बाळाची आई कशी कोसळते, या सत्य घटनेवर आधारित परफॉर्मन्स सादर केला. या परफॉर्मन्सनंतर उपस्थितांचे डोळे पाणावले. यावेळी भारतीने आई होण्याचे प्लॅनिंग कोरोनाच्या स्थितीमुळे कसे पुढे ढकलावंलागलं, असं सांगितलं.हे सांगताना तिला अश्रू अनावर झाले.

मराठी कलाकारांनी कोरोनाला कसं हरवलं?; अनुभवाद्वारे केलं चाहत्यांना सावध

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

यावेळी भारती सिंग म्हणाली,की आम्ही बाळाला जन्म देण्याच्या विचारात होतो. पण अशा घटना ऐकल्यानंतर आम्ही कुटुंब सुरु करण्याच्या विचारापासून परावृत्त झालो. आम्ही दोघंही मुद्दामच मूल होण्याबाबत बोलत नाही,कारण आम्हाला असं रडायचं नाही.

यावेळी कोरोनाविरुध्दची आईची लढाई आठवल्याने भारती काही वेळ भावनिक झाली. कोरोना आपल्या सगळ्यांना खूप रडवतोय. त्याने आतापर्यंत अनेक जीव घेतले आहेत. माझ्या आईला देखील कोरोनाचा संसर्ग झाला होता. आमच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं तिनं मला फोन करुन सांगतलं. त्यावेळी ती खूप रडली. त्यावेळी मलाही भिती वाटली की असा फोन मला आला तर मीकायकरावं. कोरोनामुळे सगळं मोडून पडलयं,असं यावेळी भारतीसिंगने सांगितलं.

डान्स दिवाने या रिअलिटी शोच्या या एपिसोडमध्ये अभिनेता सोनू सूद (Sonu Sood)पाहुणा जज्ज (Guest Judge)म्हणून सहभागी झाला होता. यावेळी देशातील कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व स्पर्धकांनी कोविड योद्ध्यांना मानवंदना दिली. तसंच यावेळी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लोकांना मदत केल्याबद्दल सोनू सूदचे आभार मानण्यात आले.

First published: May 3, 2021, 4:47 PM IST

ताज्या बातम्या