मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Bigg Boss 16 : लेकाला सलमानच्या हातात देऊन भारतीनं काढला पळ; भाईजाननं 'गोला'ला कसं सांभाळलं बघा

Bigg Boss 16 : लेकाला सलमानच्या हातात देऊन भारतीनं काढला पळ; भाईजाननं 'गोला'ला कसं सांभाळलं बघा

भारती सिंह सलमान खान

भारती सिंह सलमान खान

बिग बॉसच्या मंचावर पहिल्यांदा भारती सिंहची एंट्री होणार आहे. एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे ज्यात भाईजानकडे मुलाला सोडून भारतीनं पळ काढलाय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 13 जानेवारी : बिग बॉस 16नं चांगलीच रंगत आणली आहे. नुकताच घरात फॅमिली विक झाला. बिग बॉस घरातील शंभर दिवस पार पडले आहेत. शंभराव्या दिवशी घरातील फॅमिली विक पार पडला आणि फिनाले पर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्या सदस्यांना नवी उर्जा मिळाली. काल अभिनेत्री सिम्मी अग्रवाल बिग बॉसच्या घरात आली होती. तिनं सर्वांबरोबर गप्पा मारल्या. त्यांचे विचार ऐकून घेतले. आज मात्र बिग बॉसच्या घरात हंगामा होणार आहे. प्रेक्षक पोट धरून हसणार आहेत. कारण लाफ्टर क्विन भारती सिंह बिग बॉसच्या घरात एंट्री घेणार आहे. भारती एकटी नाही तर नवरा हर्ष आणि मुलाला देखील घरात घेऊन जाणार आहे.  बिग बॉसच्या मंचावर पहिल्यांदा भारती सिंहची एंट्री होणार आहे. एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे ज्यात भाईजानकडे मुलाला सोडून भारतीनं पळ काढलाय.

भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया बिग बॉसच्या घरात जाणार आहे. सर्वांना सप्राइज करण्यासाठी भारती तिच्या मुलाला म्हणजेच गोलाला देखील घेऊन आली.  प्रोमोमध्ये भारती म्हणतेय, सलमाननं मला प्रोमिस केलं होतं की तुझ्या मुलाला मी लाँच करणार. भारती मुलाला घेऊन येते. गोलाला पाहून सलमान खूश होतो. तो त्याला उचलून घेतो आणि त्याच्या हातात पहिल्या भेटीचं खास गिफ्ट ठेवतो. सलमान खाननं भारतीच्या मुलाला त्याचं फेमस निळ्या रंगाचं चांदीचं ब्रेसलेट दिलं.  गोलाला काही कळत नसलं तरी तो सगळं मस्त एन्जॉय करताना दिसतोय.

हेही वाचा - Bigg Boss 16: बिग बॉस मध्ये मोठा ट्विस्ट; एकाचवेळी 'हे' तीन स्पर्धक घेणार घरातून एक्झिट

त्यानंतर भारतीनं थेट सलमानचं पनवेलचं फार्महाऊसपण मुलाच्या नावावर करून घेतलं. भारती सलमानची एका कागदावर सही घेते. सलमान सही करतो. नंतर भारती त्याला विचारते तुम्ही पनवेलच्या फार्महाऊनचं समान कधी शिफ्ट करणार. त्यावर सलमान म्हणतो का? भारती म्हणते तुम्ही आता सगळे प्रॉपर्टी गोलाच्या नावावर केली ना. यावर सलमान पोट धरून हसतो.

भारती बिग बॉसच्या घरात पहिल्यांदा एंट्री करणार आहे.  तिने आणि हर्षनं गोलाला सलमानच्या हातात देऊन थेट बिग बॉसच्या घरात पळ काढला. भारतीचा सलमान आणि गोलाबरोबरचा हा एपिसोड प्रेक्षक एन्जॉय करतील यात काही शंका नाही.

First published:

Tags: Bigg boss, Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News