Home /News /entertainment /

VIDEO: टीव्ही शोमध्ये पार पडला भारती सिंहचा Baby Shower, परंतु गिफ्ट पाहून भडकली कॉमेडियन

VIDEO: टीव्ही शोमध्ये पार पडला भारती सिंहचा Baby Shower, परंतु गिफ्ट पाहून भडकली कॉमेडियन

पहिल्यांदाच एका रिअॅलिटी शोमध्ये नॅशनल टीव्हीवर बेबी शॉवर सोहळा पार पडला.

  मुंबई, 12 फेब्रुवारी-  प्रसिद्ध कॉमेडियन   (Comedian)  भारती सिंह  (Bharati Singh)  आणि हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachia)  यांच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. दोघेही एप्रिलमध्ये आई-बाबा बनणार आहेत. भारतीला पापाराझींनी अनेक वेळा बेबी शॉवरबद्दल  (Baby Shower)  प्रश्न विचारला, पण तिने कोरोनामुळे बेबी शॉवर न करण्याचा निर्णय घेतला असल्याचं होतं. भारतीची ही इच्छा कलर्स वाहिनीने पूर्ण केली आहे.पहिल्यांदाच एका रिअॅलिटी शोमध्ये नॅशनल टीव्हीवर बेबी शॉवर सोहळा पार पडला.'हुनरबाज: देश की शान' (Hunarbaaz: Desh Ki Shaan) या रिअॅलिटी शोमध्ये हा विधी पार पडला. परंतु शोच्या परीक्षकांनी दिलेल्या भेटवस्तू पाहून भारती रागाने लाल झाली होती.पाहूया नेमकं काय घडलं. हुनरबाज: देश की शान' या टीव्ही शोच्या मंचावर भारती सिंहचा बेबी शॉवर सोहळा पार पडला. या सोहळ्यात हर्ष लिंबाचियासह शोचे परीक्षक मिथुन चक्रवर्ती, करण जोहर, परिणीती चोप्रा यांनीही हजेरी लावली होती. भारतीच्या बेबी शॉवरची एक झलक चॅनलने प्रोमोमध्ये शेअर केली आहे. व्हिडिओमध्ये, हर्ष भारतीच्या डोळ्यांवर एक काळी पट्टी बांधतो आणि तिला स्टेजवर घेऊन येतो. तिला सोफ्यावर आरामात बसवतो. दुसरीकडे, करण जोहर, मिथुन आणि परिणीती शांतपणे भारतीकडे येतात आणि अचानक तिच्या डोळ्याची पट्टी काढून भारतीला आश्चर्यचकित करतात. वाहिनीचे आभार मानत भारती म्हणते, खूप खूप धन्यवाद कलर्सने माझी इच्छा पूर्ण केली… करण म्हणतो या सर्व गोष्टी होत राहतील पण भेटवस्तू कुठे आहेत. हर्ष म्हणतो, सर, तुम्हाला माहिती आहे का भारती आणि मी कोणाच्याही बेबी शॉवरला जातो तेव्हा आम्ही रिकाम्या हाताने जात नाही. खूप लाज वाटते. हर्षचे म्हणणे ऐकून करण म्हणतो, गिफ्ट्स यायला हवेत असा इशारा देत आहात का? हर्ष सांगतो की, कोणताही इशारा नाही. तर त्याने भेटवस्तू हवेत असं त्याने तोंडावर सांगितलं.
  View this post on Instagram

  A post shared by ColorsTV (@colorstv)

  यावर उत्तर देत, परिणीती म्हणते की मी इथे रिकाम्या हाताने आले आहे असं तुम्हाला वाटतं… मला सर्वांनी सांगितलं होतं की मी जेव्हा कधी जाईन तेव्हा सोन्याच्या वस्तू घेऊन जा. हे ऐकून भारतीचे तोंड उघडले. पण भारतीने गिफ्ट बघताच ती रागाने लाल झाली आणि म्हणाली, जा इथून… आता परिणीतीने काय गिफ्ट दिले, हे येत्या एपिसोड्समध्ये कळेलच. (हे वाचा:Raqesh Bapat ने खरेदी केली Audi Q7, किंमत वाचून व्हाल थक्क) भारती-हर्षची लव्हस्टोरी- याआधी, निर्मात्यांनी शोचा प्रोमो शेअर केला होता. ज्यामध्ये एका डान्स ग्रुपने त्यांच्या डान्सद्वारे दोघांच्या लव्हस्टोरीची झलक दाखवली होती. ज्यामध्ये भारती आधी हसताना आणि नंतर भावुक झालेली दिसली होती.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Comedian, Entertainment, Tv actress

  पुढील बातम्या