कपिलच्या शोमध्ये सलमाननं 'भारत'चं सांगितलं मोठं गुपित

कपिलच्या शोमध्ये सलमाननं 'भारत'चं सांगितलं मोठं गुपित

'भारत' सिनेमाची खूप चर्चा आहे. कपिलच्या शोमध्ये सलमाननं या सिनेमातलं एक गुपितच सांगून टाकलं.

  • Share this:

मुंबई, 07 जानेवारी : कपिल शर्मा परत आला तो मोठा धमाकेदार पद्धतीनं. त्याच्या पहिल्याच एपिसोडमध्ये रणवीर सिंग, सारा यांनी धमाल केली. हा शो सलमान खान निर्मित करतोय. त्यामुळे सलमान आणि त्याच्या कुटुंबानंही हजेरी लावलीच.

सलमान खान कपिलशी अगदी दिलखुलास बोलला. बाॅलिवूडमध्ये लग्नाचा सीझन सुरू होता. प्रियांका-निक, दीपवीर यांची लग्न तर भरपूर गाजली. आता शोमध्ये सलमानच्या लग्नाचा विषय निघाला नसता, तरच नवल.

कपिलनं सलमानला लग्न कधी करणार, हा प्रश्न विचारलाच. यावर सलमान म्हणाला, 'भारत सिनेमात तर माझं 72 वर्षांचा होईपर्यंत लग्न होत नाही.मी तेच फाॅलो करतोय.'त्यावर कपिलनंही हजरजबाबी उत्तर दिलं. तो म्हणाला, भारत आता बनलाय. याआधी कोणाला फाॅलो करत होतास?

अभिनेता सलमान खानचे फॅन्स असोत वा त्याच्यावर टीका करणारे असोत. सगळ्यांना एकच प्रश्न पडलाय. त्या प्रश्नाचं उत्तर ते शोधत असतात. तो म्हणजे सलमान लग्न कधी करणार? पण एका अभिनेत्यामुळे सल्लूमियाँनं लग्न केलं नाही.

कपिल शर्माच्या शोमध्ये सलमानं या प्रश्नाचं उत्तर दिलंय. तो म्हणाला, एकदा संजय दत्त मला लग्नाचे फायदे समजवून सांगत होता. तू शूटिंगहून थकून येशील. तुझी पत्नी घरी तुझी काळजी घेईल. तुझं डोकं दाबून देईल. हे सर्व सांगताना त्याचा फोन सारखा वाजत होता. शेवटी माझ्याशी बोलायचं थांबून त्यानं फोन उचलला. हे सांगताना सलमानला हसू आवरत नव्हतं.

सलमान म्हणाला, वाढदिवसानिमित्त त्याच्या आईनं त्याच्याकडे खास गिफ्ट मागितलंय. ते काय आहे ठाऊकेय? त्याची आई म्हणाली, आता फोर पॅक खूप झाले. सिक्स पॅक घेऊन ये.त्यासाठी तो खूप मेहनत करतोय. सकाळ-संध्याकाळ जिमला जातोय. धावायचा व्यायाम करतोय. शिवाय खाण्यावरही नियंत्रण ठेवतोय.

कदाचित पुढच्या वर्षापर्यंत हे सिक्स पॅक तयार होतील आणि भारत सिनेमात ते पाहायला मिळतील. सलमान म्हणाला, मी आईला दिलेली ही भेट ट्विटरवर शेअर करेन.सलमान आपल्या आईशी खूप अॅटॅच्ड आहे.

करण जोहरच्या तोंडून निघालं मलायका-अर्जुनच्या नात्यातलं सत्य

First published: January 7, 2019, 2:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading