मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अखेर 'भारत'साठी मिळाली परदेशात राहिलेली अभिनेत्री!

अखेर 'भारत'साठी मिळाली परदेशात राहिलेली अभिनेत्री!

 सध्या बाॅलिवूडमध्ये एकच चर्चा सुरू आहे. 'भारत' प्रियांकानं सोडला. आता तिच्या जागी कोण, याचे अंदाज सुरू झाले.

सध्या बाॅलिवूडमध्ये एकच चर्चा सुरू आहे. 'भारत' प्रियांकानं सोडला. आता तिच्या जागी कोण, याचे अंदाज सुरू झाले.

सध्या बाॅलिवूडमध्ये एकच चर्चा सुरू आहे. 'भारत' प्रियांकानं सोडला. आता तिच्या जागी कोण, याचे अंदाज सुरू झाले.

मुंबई, 30 जुलै : सध्या बाॅलिवूडमध्ये एकच चर्चा सुरू आहे. 'भारत' प्रियांकानं सोडला. आता तिच्या जागी कोण, याचे अंदाज सुरू झाले. कोण म्हणालं, करिना कपूर कोण म्हणालं कतरिना. प्रियांका चोप्रानं सिनेमा सोडला यावर सलमाननं काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण सलीम खान यांनी  तर प्रियांकाच्या जागी दुसरी कोण तरी येईल, असंही सांगितलं. तेही रागातच. प्रियांकानं फक्त निकसाठी सिनेमा सोडला नाही तर सिनेमात इतरही अभिनेत्री असल्यामुळे सोडला, अशीही चर्चा सुरू झाली होती.

सरतेशेवटी 'भारत'मधल्या अभिनेत्रीचं नाव फायनल झालं.  कतरिना कपूर या सिनेमात आता प्रियांकाच्या जागी असणार आहे. दिग्दर्शक अली अब्बासनं मुंबई मिररशी बोलताना सांगितलं, ' मी कतरिनासोबत काम करायला खूप खूश आहे. कतरिना आणि सलमान एकत्र पडद्यावर आले की एकदम हिट जोडी ठरते.'

अली, सलमान आणि कतरिना तिघांनी एकत्र काम 'टायगर जिंदा है'मध्ये केलं होतं. सलमान-कॅट दबंग, एक था टायगर, मैने प्यार क्यूं किया अशा सिनेमांमध्ये एकत्र होते. सलमान आणि कतरिनाचं अफेअरही गाजलं होतं. सलमानला कतरिनाबद्दल साॅफ्ट काॅर्नर आहे, हे तर सगळ्यांना माहीत आहे.

हेही वाचा

कोण आहे सर्वात श्रीमंत? प्रियांका की निक?

VIDEO : ... अन् आनंद आहुजानं सोनमला उचलून घेतलं

PHOTOS : अभिनेत्री ऋचा चड्डा शकिलाच्या भूमिकेत 'अशी' दिसेल!

सलमान खानच्या 'भारत'चं शूटिंग सुरू झालंय आणि सिनेमातला सलमानचा लूकही समोर आलाय. प्रियांका चोप्राही मेहबूब स्टुडिओत काही दिवसांपूर्वी दिसली होती. भारत सिनेमाचं दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलंय. सलमान खान या सिनेमात 5 लूकमध्ये दिसणार आहे. वय वर्ष 25 ते वय वर्ष 65पर्यंतचा त्याचा प्रवास या सिनेमात आहे.

याशिवाय टायगर झिंदा है नंतर सलमान-कतरीनाची जोडी  धूम 4 मध्येही दिसणार अशी चर्चा आहे. धूम 3मध्ये आमीर खानसोबत कतरिनाची जोडी होती, त्यामुळे कतरिनासाठी धूमची सीरिज काही नवी नाही. सलमान खान धूम 4 करणार हे ठरल्यावर सलमान खानसोबत कतरिनाच्या नावाची वर्णी लागणं हे काही फार धक्कादायक नाही. कारण कतरिना ही सलमानची खास मैत्रीण आहे आणि सलमान-कतरिनाची ऑन स्क्रिन जोडी प्रेक्षकांना पहायला आवडते.

त्यामुळे यशराजनेही सलमान-कतरिना जोडीलाच प्राधान्य द्यायचं ठरवलेलं दिसतंय. सलमान-कॅटच्या चाहत्यांसाठी ही एक धमाल ट्रीट असू शकते.

First published:

Tags: Bharat, Katreena, Priyanka chopra, Salman khan, कतरिना कैफ, प्रियांका चोप्रा, भारत, सलमान खान