दसऱ्याच्या मुहूर्तावर नवी मालिका, भरत-केदार अनेक वर्षांनी एकत्र येणार

दसऱ्याच्या मुहूर्तावर नवी मालिका, भरत-केदार अनेक वर्षांनी एकत्र येणार

'सुखी माणसाचा सदरा' ही अतिशय वेगळ्या धाटणीची मालिका कलर्स मराठीवर सुरू होत आहे. यात भरत जाधव (Bharat Jadhav) आणि केदार शिंदे (Kedar Shinde) अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र काम करणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 02 ऑक्टोबर : भारत जाधव (Bharat Jadhav) आणि केदार शिंदे (Kedar Shinde) यांच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा संपूर्ण मराठी इन्डस्ट्रीमध्ये रंगली होती. ही जोडगोळी एकत्र येऊन कोणत्या प्रोजेक्टवर काम करत आहे याची उत्सुकता आता संपली आहे. 25 ऑक्टोबरला म्हणजे दसऱ्याच्या मुहूर्तावर 'सुखी माणसाचा सदरा' ही नवी मालिका कलर्स मराठीवर येत आहे. या मालिकेच्या निमित्ताने भरत जाधव अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

केदार शिंदे आणि भरत जाधव या दोघांनीही स्वत: आपल्या सोशल मीडियावर नव्या मालिकेच्या प्रोमो शेअर केला आहे. भरतचे चाहते त्याला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. प्रोमोमध्ये भरत जाधव सामान्य माणसाच्या भूमिकेत दिसत आहे. त्याने शेअर केलेल्या प्रोमोला अनेक लाइक्स मिळाले आहेत. अगंबाई अरेच्चा, खो-खो,यांचा काही नेम नाही यांसरखे चित्रपट, सही रे सही, लोचा झाला रे, श्रीमंत दामोदर पंत अशी अनेक नाटकं केदार शिंदे यांनी दिर्ग्दशित केली आहेत. त्याला प्रेक्षकांची पसंतीही मिळाली आहे.

श्रीयुद गंगाधर टिपरे या मालिकेनंतर 'सुखी माणसाचा सदरा' ही अतिशय वेगळ्या घाटणीची मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक मालिका, वेबसीरिज रिलीज झाल्या. आता सुखी माणसाचा सदरा छोट्या पडद्यावर नवीन काय घेऊन येते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. भरतसोबत आणखी कोणते कलाकार या मालिकेमध्ये काम करणार आहेत हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण याचा प्रोमो पाहिल्यानंर प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढली आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 2, 2020, 11:58 AM IST
Tags: serial

ताज्या बातम्या