वयाच्या 53 वर्षीही बाबा बनण्यासाठी सलमानने ठेवली ही अट, म्हणाला मुलं हवी पण...

वयाच्या 53 वर्षीही बाबा बनण्यासाठी सलमानने ठेवली ही अट, म्हणाला मुलं हवी पण...

सलमानचं नाव आता पर्यंत बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे पण यातलं एकही नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही.

  • Share this:

मुंबई, 22 मे : बॉलिवूडचा दबंग सलमान खान लवकरच सरोगेसीच्या माध्यमातून बाबा होण्याच्या तयारीत आहे अशा चर्चा मागच्या काही दिवसांपासून सगळीकडे सुरू आहे. सलमान खान आता 53 वर्षांचा असून त्यानं अद्याप लग्न केलेलं नाही. त्यामुळे तो लग्न कधी करणार याकडे त्याच्या सर्व चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. पण सलमान काही अद्याप लग्नाच्या मूडमध्ये दिसत नाही. नुकतंच भारतच्या एका प्रमोशन दरम्यान सलमाननं बाबा बनण्यासाठी एक विचित्र अट ठेवली आहे. मला मुलं हवी आहेत पण त्यांची आई नको अशी अट यावेळी सलमाननं घातली.

मुंबई मिररला दिलेल्या एका मुलाखतीत सलमाननं ही अट सांगितली. सलमान म्हणाला, 'मला मुलं हवी आहेत. पण मुलांसोबत त्यांची आई सुद्धा येते. मला मुलांची आई नको पण मुलांना त्यांच्या आईची गरज असते. माझ्या घरात माझ्या मुलांची काळजी घ्यायला खूप सारे लोक आहेत.' सलमाननं दिलेलं हे उत्तर सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्याच्या या वक्तव्यानं तो खरोखरच सरोगेसीद्वारे बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चांना आता आणखीच खतपाणी मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

Sunday - Funday ! Family Time 😘 Nana & Mamu Loving @beingsalmankhan

A post shared by Arpita Khan Sharma (@arpitakhansharma) on

या आधीही एका मुलाखतीत सलमाननं 'मी एका चांगला मुलगा आणि माझ्या मुलांचा बाबा होऊ शकतो मात्र मी चांगला पती होऊ शकत नाही' असं सांगितलं होतं. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच सलमान खान सरोगेसीच्या माध्यमातून बाबा होण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. सलमानला लहान मुलांची किती आवड आहे हे सर्वांनाच माहीत आहे. तो अनेकदा अर्पिता मुलगा अहिलबरोबर मस्ती करताना दिसतो. त्यांचे अनेक व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

 

View this post on Instagram

 

My life in one frame😍 My brother & My son. Thank you god for the choicest blessing 🙏

A post shared by Arpita Khan Sharma (@arpitakhansharma) on

सलमानला बॉलिवूडमध्ये जवळपास 30 वर्ष झाली. त्याचं नाव आता पर्यंत अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे पण यातलं एकही नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. त्यामुळेच की काय सलमानला बॉलिवूडमधील मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून ओळखलं जातं. सलमानच्या अगोदर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सरोगेसीच्या माध्यमातून पालक होण्याचा पर्याय निवडला आहे. यात तुषार कपूर, एकता कपूर, शाहरुख खान, सनी लिओनी यांचा समावेश आहे.

बिग बी अमिताभ यांच्याबरोबर 'AB आणि CD' गिरवताना दिसणार 'हा' मराठमोळा हिरो

प्रियांकाबद्दल विचारल्यावर उखडला सलमान खान, म्हणाला...

'कोण होणार करोडपती?'मध्ये प्रेक्षकांसाठीही आहे 'ही' मोठी संधी

First published: May 22, 2019, 8:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading