News18 Lokmat

सलमानच्या टोमण्यांवर प्रियांकानं पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

‘द स्काय इज पिंक’ या सिनेमातून जवळपास 3 वर्षांनी प्रियांका बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 13, 2019 04:54 PM IST

सलमानच्या टोमण्यांवर प्रियांकानं पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

मुंबई, 13 जून : अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या भारतात असून तिनं नुकतंच ‘द स्काय इज पिंक’ या सिनेमाचं शूटिंग संपवलं आहे. त्यानंतर तिनं या सिनेमाच्या रॅपअप पार्टीला देखील हजेरी लावली. या पार्टीमध्ये ती धम्माल डान्स करताना दिसली. यावेळी तिच्यासोबत फरहान अख्तर आणि जायरा वसीम हे देखिल या पार्टीमध्ये दिसले. या सिनेमाच्या अगोदर प्रियांकानं ‘भारत’ सिनेमा साइन केला होता मात्र नंतर तिनं या सिनेमाला नकार देत बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी सोनाली बोसच्या ‘द स्काय इज पिंक’ची निवड केली. त्यामुळे ‘भारत’ सिनेमाच्या प्रत्येक प्रमोशन इव्हेंटमध्ये सलमाननं प्रियांकाला टोमणा मारायची एकही संधी सोडली नाही. प्रियांकानं यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता मात्र तिनं यावर सडेतोड उत्तर दिलं आहे.

OMG ! रणवीरची ऑनस्क्रीन पत्नी साकारण्यासाठी दीपिकानं घेतलं एवढं मानधन




Loading...

 





View this post on Instagram




 

And it’s a wrap. This movie is special to me on so many levels. Not just because @roykapurfilms and @rsvpmovies (Sid and ronnie) partnered with me on my first Hindi production.. but also took the chance on me to bring to life a character and a true story that needed to be told. @faroutakhtar you made an amazing co actor all over again with all the laughter and fun!(you were missed tonight) and my amazing @zairawasim_ and @rohitsaraf10 who I’ve made friends for life with! This was the hardest loveliest experience. Thank you @shonalibose_ for your incredibly unique vision. I’m so proud of your faith in me. Thank you so much to Our crew who worked tirelessly for 10 months to make this special piece of cinema. I love you all. ❤️ See u at the pictures!!! 🙏🏽 #skyispink 🍿 🎥


A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on





‘द स्काय इज पिंक’ या सिनेमातून जवळपास 3 वर्षांनी प्रियांका बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. या सिनेमाच्या रॅपअप पार्टीमध्ये बोलताना प्रियांका म्हणाली, ‘मला अनेकांनी मी ‘भारत’ सोडून ‘द स्काय इज पिंक’ का निवडला असा प्रश्न विचारला. पण मला ‘भारत’ सारख्या ‘डान्स-साँग सिनेमा’पेक्षा ‘द स्काय इज पिंक’ची कथा जास्त आवडली. मी या सिनेमात 18 वर्षीय मुलीच्या आईची भूमिका साकारत आहे. पण हा सिनेमा मी फक्त दिग्दर्शक सोनाली बोससाठी केला. कारण या सिनेमाची कथा खूप वेगळी आहे आणि मला ती खूप आवडली त्यामुळे मी हा सिनेमा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी निवडला.’

अ‍ॅक्शन... थ्रीलर... रोमांस, प्रभासच्या बहुचर्चित Saaho चा टीझर रिलीज




‘भारत’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. या सिनमाच्या प्रत्येक प्रमोशन इव्हेंटमध्ये सलमाननं प्रियांकावर निशाणा साधला होता. सलमाननं सांगितलं, ‘लग्नासाठी प्रियांकानं हा सिनेमा सोडला. खरं तर बॉलिवूडमध्ये येण्यासाठी तिनं खूप मेहनत घेतली आहे. ती खूप प्रोफेशनल आहे.’ पण त्यानं प्रत्येक वेळी प्रियांकाला टोमणा मारला होता. प्रियांकानं ‘भारत’ सोडल्यानंतर त्या ठिकाणी कतरिना कैफची वर्णी लागली. प्रियांकाचा ‘द स्काय इज पिंक’ हा सिनेमा मोटिव्हेशनल स्पीकर आयशा चौधरीच्या पालकांच्या जीवनावर आधारित आहे. हा सिनेमा येत्या 11 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

MeToo : तनुश्री दत्ता प्रकरणात अभिनेता नाना पाटेकर यांना पोलिसांकडून क्लिनचीट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 13, 2019 04:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...