ग्रँड ओपनिंगपेक्षा 'भारत'बाबतच्या या खास गोष्टीमुळे खुश आहे सलमान खान

ग्रँड ओपनिंगपेक्षा 'भारत'बाबतच्या या खास गोष्टीमुळे खुश आहे सलमान खान

'भारत'नं प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 42.30 कोटींची घसघशीत कमाई करत बॉक्स ऑफिसवर एक नवा रेकॉर्ड केला.

  • Share this:

मुंबई, 06 जून : अभिनेता सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला सिनेमा 'भारत'नं प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 42.30 कोटींची घसघशीत कमाई करत बॉक्स ऑफिसवर एक नवा रेकॉर्ड केला. भारतच्या या शानदार यशामुळे सलमान खान खूप खुश आहे आणि यासाठी त्यानं चाहते आणि प्रेक्षक यांचे आभार मानले आहेत. सलमाननं त्याच्या ट्वीटमध्ये चाहत्यांसाठी खास मेसेज लिहून आपला आनंद व्यक्त केला.

सलमाननं लिहिलं, 'खूप खूप धन्यवाद, माझ्या करिअरमधील सर्वात मोठ्या ओपनिंगसाठी. पण मला सर्वात जास्त आनंद त्यावेळी झाला, जेव्हा सिनेमातील एका सीन दरम्यान राष्ट्रगीत सुरू झालं आणि त्याच्या सन्मानासाठी सर्वजण उभे राहिले. यापेक्षा मोठा दुसरा कोणताच सन्मान असू शकत नाही. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. जय हिंद भारत.'

सलमानचा ‘दबंग’ अवतार, भरगर्दीत स्वतःच्याच बॉडीगार्डच्या कानशिलात लगावली, Video Viral

5 जूनला ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा 'भारत' सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाच्या एका सीनमध्ये सलमान खान देशातील गरीबी आणि नोकरीची गरज याविषयी बोलताना दिसतो. या सीन दरम्यान अचानक राष्ट्रगीत सुरू होतं. या सीनच्यावेळी थिएटरमध्ये एक विशेष गोष्ट पाहायला मिळाली. सीनदरम्यान राष्ट्रगीत सुरू झाल्यावर सर्व प्रेक्षक उठून उभे राहिले. प्रेक्षकांची हीच गोष्ट सलमानला खूप भावली. सिनेमाला मिळालेलं हे प्रेम आणि सन्मानासाठी सलमान खान खूप खुश आहे.

सासऱ्यांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा व्यक्त झाली काजोल, इन्स्टाग्रामवर लिहिली अशी पोस्ट

पहिल्याच दिवशी 'भारत'ने रेकॉर्डब्रेक कमाई करत 42 कोटींचा गल्ला जमवला. ही सलमानच्या करिअरमधील सर्वात मोठी ओपनिंग होती. कोरियन फिल्म 'ओड टू माय फादर'चा रिमेक असलेल्या या सिनेमात सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

कार्तिक आर्यन नाही तर 'या' व्यक्तीसोबत साराला घालवायचंय तिचं संपूर्ण आयुष्य

First published: June 6, 2019, 4:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading