News18 Lokmat

भजन सम्राट त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत झाले ट्रोल

अनुप जलोटा यांनी त्यांच्यापेक्षा ३७ वर्षांनी लहान असलेल्या मुलीसह घरात ‘विचित्र जोडी’ म्हणून एंट्री केलीय. ती मुलगी म्हणजे गायिका जसलीन माथारू.

News18 Lokmat | Updated On: Sep 17, 2018 01:58 PM IST

भजन सम्राट त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत झाले ट्रोल

मुंबई, 17 सप्टेंबर : बॉलिवूडचा दबंग सलमान खान पुन्हा एकदा हिंदी बिग बॉसचं १२वं पर्व घेऊन आलाय. बिग बॉस हा रिआलिटी शो पहिल्या पर्वापासूनच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. मग ते सलमानमुळे असो किंवा घरातल्या स्पर्धकांमुळे. १५ सप्टेंबरला बिग बॉसचं नवं पर्व सुरू झालंय. सलमान तर आहेच पण याच्या पहिल्याच एपिसोडपासूनच स्पर्धकही प्रेक्षकांच्यातील चर्चेचा विषय बनलाय.

बिग बॉसमध्ये दर वर्षी नवनवीन थीम असतात. यावेळी देखील ‘जोडी’ थीम घेऊन बिग बॉस प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. या १२व्या पर्वात ‘भजन सम्राट’ अनुप जलोटा यांनी त्यांच्यापेक्षा ३७ वर्षांनी लहान असलेल्या मुलीसह घरात ‘विचित्र जोडी’ म्हणून एंट्री केलीय. ती मुलगी म्हणजे गायिका जसलीन माथारू. जलोटांनी एवढ्या लहान मुलीसोबत घरात एंट्री केलेली मुलगी ही त्यांची गर्लफ्रेंड आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जातंय.

Loading...

आत्तापर्यंत अनेक कलाकारांनी बिग बॉसच्या घरात एंट्री केलीय आणि प्रेक्षकांनी त्यांना ट्रोल केलंय. पण अनुप जलोटा एवढे महान भजन गायक आहेत ज्यांच्या बाबतीत लोकांच्या मनात खूप आदर आहे. त्यांना २८ वर्षांच्या मुलीसोबत पाहिल्याने लोकांचा विश्वास बसला नाही. त्यामुळे प्रेक्षक त्यांना ट्रोल करतायत. काहींनी त्यांच्या नात्याची तुलना निक आणि प्रियांकाशी केलीय.. त्याचबरोबर 'हेरा फेरी'मधला परेश रावलचा डायलॉग ‘उठा ले रे बाबा’ यावरून देखील ट्रोल करण्यात आलं.

बिग बाॅसच्या घरात शिरताना जलोटा म्हणाले, 'प्रत्येक जण वेगळा असतो. मी अध्यात्मिक गाण्यांना वाहून घेतलंय. मला राग येत नाही. माझा कल अडचणी सोडवण्याकडे असतो.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 17, 2018 01:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...