भजन सम्राट अनूप जलोटा Bigg Boss च्या जलव्यानंतर आता थेट सत्य साईबाबांच्या भूमिकेत, दोघांमध्ये आहे 55 वर्षांपूर्वीचं कनेक्शन

भजन सम्राट अनूप जलोटा Bigg Boss च्या जलव्यानंतर आता थेट सत्य साईबाबांच्या भूमिकेत, दोघांमध्ये आहे 55 वर्षांपूर्वीचं कनेक्शन

सत्य साईबाबा (Satya sai baba) यांच्या जीवनावर अधारित असलेल्या चित्रपटात (biopic) अनूप जलोटा (anoop jalota) मुख्य भूमिका (main role) साकारणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 12 जानेवारी: प्रसिद्ध गायक आणि भजन सम्राट अनूप जलोटा अलिकडच्या काळात गायनाव्यतिरिक्त वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत.Bigुg Boss मध्ये आपल्या निम्म्या वयाच्या जसलीनबरोबर रोमॅन्स केल्यानंतर आता थेट ते आपल्याला पडद्यावर सत्य साईबाबा साकारताना दिसणार आहेत. आध्यात्मिक गुरू सत्य साईबाबा यांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटात अनूप जलोटा मुख्य भूमिका साकारणार आहेत. स्वतः अनूप जलोटा देखील सत्य साई बाबांचे अनुयायी होते, अशी माहिती त्यांनी नुकतीच दिली आहे. यावेळी त्यांनी सत्य साई बाबा सोबतच्या आठवणींना उजाळाही दिला आहे.

आता अनूप जलोटा या चित्रपटाच्या निमित्ताने प्रमोशन करतानाही सत्य साई बाबा यांच्या वेशातच विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. एका माध्यम संस्थेला दिलेल्या मुलाखतीत अनूप जलोटा म्हणाले की, 55 वर्षांपूर्वी सत्य साई बाबांची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यावेळी ते बाबाला भेटले होते तेव्हा ते १२ वर्षाचे होते. यावेळी जलोटा यांनी बाबांसोबतच्या आठवणींना देखील उजाळा दिला आहे.

जलोटा यांनी पुढं असंही सांगितलं की, 'आम्ही सर्वप्रथम सत्य साईबाबांना लखनऊला असताना भेटलो. यावेळी त्यांनी माझ्या वडिलांचं भजन ऐकलं आणि आम्हाला आशीर्वाद दिला. त्यानंतर साई बाबा माझ्या वडिलांच्या संपर्कात होते. त्यांना भेटण्यासाठी आम्ही विविध ठिकाणी गेलो होतो. मुंबई, बेंगळुरू, दिल्ली आणि उटी या ठिकाणीही त्यांची भेट घेतली होती.' चित्रपटाच्या बाबतीत बोलताना त्यांनी सांगितलं की, 'मला वाटतंय की, मी त्यांच्या पात्राला योग्य न्याय देवू शकेल. कारण मीही त्यांच्या अनुयायांपैकीच एक आहे. त्यामुळे मला  ते कसे बोलतात, कसे चालतात, कसे बसतात हे माहित आहे.

त्यांनी पुढे असंही सांगितलं की, सत्य साई बाबा त्यांना 'छोटे बाबा' म्हणून हाक मारायचे. त्यावेळी मी त्यांना विचारलं होतं की, मला तुम्ही छोटे बाबा का म्हणता? तेव्हा त्यांनी मला म्हटलं होतं एका दिवशी तुला याची जाणीव नक्की होईल. आता मला याची जाणीव झाली आहे, कारण मी त्यांची व्यक्तिरेखा मोठ्या पडद्यावर निभावणार आहे.

Published by: News18 Desk
First published: January 12, 2021, 9:42 PM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading