मुंबई,3 नोव्हेंबर- दिवाळीला सुरूवात झाली आहे. बाजारपेठा देखील सजल्या आहेत. दिवाळीचा फराळ देखील काहींचा करून झाला आहे. सोशल मीडियावर तर दिवाळीचे विविध रंग पाहायला मिळत आहेत. मराठी सेलेब्सचे दिवाळीचे काही इन्स्टा रील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यामध्ये मागच्या दोन दिवसापासून मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री लिमयेचे (Bhagyashree Limaye)दिवाळी रील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. "मध्यमवर्गीय दिवाळी" , कशी असते हे तुम्हाला हे भाग्यश्रीचे रील पाहिल्यानंतर लक्षात येईल.
भाग्यश्री लिमयेने हे इन्स्टा रील सुमित पाटील याच्यासोबत केले आहे. तिने ही रील शेअर करत म्हटले आहे की, "मध्यमवर्गीय दिवाळी" ..आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ भन्नाट आहे. यामध्ये संबंध महिला वर्गाची दिवाळीत नवऱ्यांकडून जी ओरड असते त्यावरूनच हा फनी व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये भाग्यश्री हिंदी गाणं मुझे तुमसे कितने गिले..क्या किया... यावर लिपसिंग करताना दिसत आहे. तर मध्येच सुमित पाटील देखील म्हणताना दिसत आहे , पहिल्या चकल्या केल्या नंतर चिवडा केला...या दोघांचा हा फनी अंदाच चाहत्यांना दिवाळीत चांगलाच फराळ ठरला आहे.
View this post on Instagram
यावर चाहत्यांनी देखील भन्नाट कमेंट केल्या आहेत. एकाने म्हटलं आहे की, पंके पुसायचे राहिले.अजून करंज्या पण राहिलेत..झक्कास अशा कमेंट केल्या आहेत.
वाचा : अमृता खानविलकरच्या बहिणीला पाहिलंय का? दुबईमध्ये राहून करते हे काम!
सुमित पाटीलचे इन्स्टावर असे अनेक फनी व्हिडीओ पाहायला मिळतील. सध्या त्याचं हे भाग्यश्रीसोबतच रील जबरदस्त व्हायरल होत आहे. भाग्यश्री देखील सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव असते. ती तिचे काही फोटो व व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
वाचा :अरुंधतीला आशुतोषसोबत पाहून अस्वस्थ झाला अनिरुद्ध; 'आई कुठे काय करते' मालिकेने..
सध्या इन्स्टावर असे काही दिवाळी स्पेशल इन्स्टा रील तसेच दिवाळी फिल्टर मोठ्यप्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेता विराजस कुलकर्णीचे देखील इन्स्टा फिल्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.