Home /News /entertainment /

Bhagyashree Limaye news: बॉसचा झाला तिळपापड, इतका कशाचा आला राग की थेट नाक फुगवून बसायची आली वेळ?

Bhagyashree Limaye news: बॉसचा झाला तिळपापड, इतका कशाचा आला राग की थेट नाक फुगवून बसायची आली वेळ?

भाग्यश्री लिमये सध्या बॉस माझी लाडाची मालिकेत विचित्र आणि खडूस स्वभावाच्या बॉसची भूमिका साकारत आहे. मालिकेत कधीही मूड ऑफ होणाऱ्या भाग्यश्रीचा खऱ्या आयुष्यात मूड ऑफ का झालाय हे घ्या जाणून.

  मुंबई 25 मे: अभिनेत्री भाग्यश्री लिमये (Bhagyashree Limaye) सध्या बॉस माझी लाडाची या मालिकेत (Boss mazi ladachi) खडूस पण गोड अश्या बॉसच्या भूमिकेत दिसत आहे. भाग्येश्रीचा खडूसपणा फक्त भूमिकेपुरता मर्यादित राहिला नसून कदाचित आता ती खऱ्या आयुष्यातही खडूस वागते आहे का अशी शंका येत आहे. भाग्यश्रीचा मूड बराच ऑफ झालाय असं समोर येत आहे. तिच्या नव्या रीलमुळे ही शंका येत आहे. भाग्यश्रीने नवीन रील पोस्ट केलं असून यात तिला त्रास देणाऱ्या गोष्टी दाखवल्या आहेत. 'When everything and everyone around you makes you sick' असं म्हणत तिने एक धमाल रील पोस्ट केलं आहे. happens एवढंच कॅप्शन देत तिने या रीलमध्ये अचानक तुमचा मूड डाऊन करणाऱ्या गोष्टी दिवस कसा खराब करतात याच वर्णन मजेदार पद्धतीने केलं आहे. या रिलमध्ये तिने खास समर वाईब्स असा उल्लेखही केला आहे. आता मुंबईच्या उकड्यामुळे भाग्येश्री हैराण झाली आहे का? असा प्रश्न पडला आहे. मूडस्विंगज् मध्ये कोणालाही आजूबाजूच्या छोट्याश्या गोष्टींमुळे सुद्धा किती इरिटेट होतं याच मस्त चित्र या रीलमध्ये आहे. भाग्यश्री सध्या एका खडूस आणि रागीट बॉसच्या भूमिकेत दिसत आहे. त्यामुळे हळूहळू बॉससारख्या स्वभावाशी मिळतं जुळतं भाग्येश्री वागायला लागली काय अशी हलकी शंका फॅन्सना आली आहे.
  मागे एकदा भाग्यश्रीने लोकमत फिल्मी च्या इंटरव्यूमध्ये असं सांगितलही होतं की  बॉस माझी लाडाची या मालिकेतून खऱ्या भाग्यश्रीचं रूप पाहायला मिळणार आहे. "खऱ्या भाग्यश्रीला ओरडायला खूप आवडतं. तिचा राग नाकावरच असतो. ती थोडीशी खडूस सुद्धा आहे", असं भाग्यश्री हसत हसत सांगते. तिचा सहअभिनेता मात्र या गोष्टीला नकार देत म्हटला की भाग्यश्री फारच गोड आहे आणि सगळ्यांशी छान वागते. खऱ्या आयुष्यात भाग्येश्री बरीच वेगळी आहे. ती खूप खट्याळ आणि गोड आहे. वीकएंड वाईब्सबद्दल अपडेट देताना खास आनंद व्यक्त करताना तिने मागे रील पोस्ट केलं होतं. बॉस माझी लाडाचीचा ट्रॅक सध्या एकदम धमाल आणि इंट्रेस्टींग चालू आहे. पुढे ही मालिका कशी वळण घेते हे पाहणं मजेदार ठरेल.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या