मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bhagya Dile Tu Mala : 'तेव्हा माझ्या नजरेतून तू.....'; राजवर्धन- कावेरीचा Romantic अंदाज

Bhagya Dile Tu Mala : 'तेव्हा माझ्या नजरेतून तू.....'; राजवर्धन- कावेरीचा Romantic अंदाज

कलर्स मराठीवरील 'भाग्य दिले तु मला' (Bhagya Dile Tu Mala) ही मालिका प्रचंड गाजत आहे. या मालिकेतील कलाकारही प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसतायेत. या मालिकेतील नवी जोडी राजवर्धन आणि कावेरी म्हणजेच विवेक सांगळे आणि तन्वी मुंडले बरीच लोकप्रिय झाली आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 20 ऑगस्ट : कलर्स मराठीवरील 'भाग्य दिले तु मला' (Bhagya Dile Tu Mala) ही मालिका प्रचंड गाजत आहे. या मालिकेतील कलाकारही प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसतायेत. या मालिकेतील नवी जोडी राजवर्धन आणि कावेरी म्हणजेच विवेक सांगळे आणि तन्वी मुंडले बरीच लोकप्रिय झाली आहे. पडद्यावरची आणि पडद्यामागची त्यांची धमाल मस्ती चाहत्यांना नेहमची आवडते. अशातच राजवर्धन आणि कावेरीचा म्हणजेच विवेक सांगळे आणि तन्वी मुंडलेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यांचा हा पडद्यामागचा व्हिडीओ सध्या सगळ्यांचं लक्ष केंद्रित करतोय. विवेक आणि तन्वी बॅक कॅमेराही खूप मजा मस्ती करतात. अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. नुकताचं विवेक सांगळेनं तन्वी सोबतच एक रोमॅन्टिक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये तो म्हणताना दिसतोय की, 'दोन्ही हात कानांच्या पाळीजवळ जातात, नाजूक इयरिंग्स मिठीसारखे घट्ट रुतून बसतात. हमम मॅचिंग आहे ना अगदी सगळं तू टॉप ते बॉटम बघतेस. तेव्हा माझ्या नजरेतून आरशात तू किती सुंदर दिसतेस'. या डॉयलॉगवर तन्वी खूप सुंदर अभिनय करताना दिसतेय. दोघांचा हा रोमॅन्टिक व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांना खूप आवडलेला पहायला मिळतोय.
  विवेक आणि तन्वी या व्हिडीओवर चाहत्यांच्या अनेक कमेंट येतायेत. 'सो क्युट, खूप भारी जोडी आहे तुमची, तुम्ही दोघे खूप आवडता', अशा अनेक कमेंटचा पाऊस या व्हिडीओवर होतोय. याशिवाय व्हिडीओ लाईक्सही भरपूर मिळत आहेत. पडद्यावर आणि पडद्यामागेही दोघांचं बॉन्डिंग घट्ट असल्याचं वेळोवेळी दिसून येतं. हेही वाचा -  Priya Bapat: मुंबईच्या पावसाची प्रिया बापटलाही भुरळ, हातात कलरफुल छत्री घेऊन म्हणतेय.... दरम्यान, मालिकेत मंगळागौर साजरी करण्यात येणार आहेच, परंतू सानिया मात्र या आनंदाच्या क्षणात मिठाचा खडा टाकणार आहे. रत्नमाला मोहित आणि कावेरीला कसं दूर करता येईल याचा कट रचणार आहे. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागात काय घडणार? हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Colors marathi, Instagram post, Marathi entertainment, TV serials

  पुढील बातम्या