मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'भाड्याचे अवॉर्ड' सोहळ्याला पोहोचली सई ताम्हणकर, इथेही दिसला ग्लॅमरस अंदाज

'भाड्याचे अवॉर्ड' सोहळ्याला पोहोचली सई ताम्हणकर, इथेही दिसला ग्लॅमरस अंदाज

'भाड्याचे अवॉर्ड' नावाच्या एक कार्यक्रमात अभिनेत्री सई ताम्हणकरने उपस्थिती दर्शवली होती. यावेळी तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळालाो

  • Published by:  Janhavi Bhatkar
मुंबई, 31 मार्च: गेल्या काही दिवसांपासून विविध चॅनेल्सवर तुम्ही पुरस्कार सोहळ्यांचे (Award Show) कार्यक्रम बघत असाल. अगदी मराठी चॅनेल्सच्या पुरस्कार सोहळ्यापासून जगभरात मानाचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार (Oscar 2022) सोहळा देखील अलीकडेच पार पडला. या सर्व अवॉर्ड सोहळ्यादरम्यान आणखी एक अजब नावाचा अवॉर्ड शो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या पुरस्कार सोहळ्याचं नाव आहे 'भाड्याचे अवॉर्ड' (Bhadipa Presents Bhadyache Award) . सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंवरुन अभिनेत्री सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, ललित प्रभाकर, श्रुती मराठे इ. यासांरख्या अनेक कलाकारांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थिती दर्शवली होती. अभिनेत्री सई ताम्हणकर हिने देखील या कार्यक्रमादरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामध्ये ती फारच ग्लॅमरस दिसत आहे.
या कार्यक्रमाबद्दल बोलायचे झाले तर मराठीतीली आघाडीची डिजिटल कंटेट क्रिएटर प्लॅटफॉर्म भाडिपाने (Bharatiya Digital Party) ने या खास प्रोग्रॅमचे आयोजन केले होते. भाडिपाने या कार्यक्रमाची झलक दाखवणारा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये भाडिपाचा कंटेट क्रिएटर सुमित पाटील उपस्थित कलाकारांशी संवाद साधताना दिसत आहे.
हा पुरस्कार सोहळा नेमकं काय असेल याची उत्सुकता चाहत्यांनी कमेंट सेक्शनमधून व्यक्त केली आहे. मात्र सई ताम्हणकरने शेअर केलेल्या पोस्ट केलेल्या फोटोजमध्ये कॅप्शनसह काही हॅशटॅग पोस्ट केले आहेत. #roastnight #fancyroast असे हॅशटॅग वापरत सईने ही पोस्ट केली आहे. त्यावरुन असा अंदाज बांधता येत आहे की हा असा कार्यक्रम आहे ज्यामध्ये काही व्यक्तींना Roast केलं जातं. त्यामुळे या कार्यक्रमात कॉमेडियन्सच्या गंमतीजमतीचे शिकार मराठी सिनेसृष्टीतील कलाकार बनले असावेत.
First published:

Tags: Sai tamhankar

पुढील बातम्या