Home /News /entertainment /

Bhabi Ji Ghar Par Hain: अंगूरी भाभीच्या भूमिकेसाठी अभिनेत्री शिल्पा शिंदेने घातली होती 'ही' अट

Bhabi Ji Ghar Par Hain: अंगूरी भाभीच्या भूमिकेसाठी अभिनेत्री शिल्पा शिंदेने घातली होती 'ही' अट

bhabi ji ghar par hai shilpa shinde

bhabi ji ghar par hai shilpa shinde

अंगूरी भाभीच्या भूमिकेत आधी झळकलेल्या अभिनेत्री शिल्पा शिंदेने (Shilpa Shinde) आपल्या हटके अभिनयाने प्रेक्षकांच्या मनांवर आपली छाप सोडली होती. जी आजही कायम आहे. जेव्हा या प्रसिद्ध भूमिकेसाठी निर्मात्यांनी शिल्पाला संपर्क केला होता. तेव्हा तिने एक वेगळीच अट त्यांच्यासमोर ठेवली होती.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 20 जानेवारी:  ‘भाभी जी घर पर हैं’ (Bhabi Ji Ghar Par Hain) या विनोदी मालिकेतील सर्व पात्रं प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेमधील गौरी मॅम असो अंगुरी भाभी असो वा विभूती जी असो वा मनमोहन तिवारी, सगळ्यांचा भन्नाट विनोदी अभिनय प्रेक्षकांना खळखळून हसवतो. अंगूरी भाभीच्या भूमिकेत आधी झळकलेल्या अभिनेत्री शिल्पा शिंदेने (Shilpa Shinde) आपल्या हटके अभिनयाने प्रेक्षकांच्या मनांवर आपली छाप सोडली होती. जी आजही कायम आहे. जेव्हा या प्रसिद्ध भूमिकेसाठी निर्मात्यांनी शिल्पाला संपर्क केला होता. तेव्हा तिने एक वेगळीच अट त्यांच्यासमोर ठेवली होती. शिल्पाने या भूमिकेसाठी ठेवली होती अट अभिनेता-अभिनेत्रीने एखाद्या भूमिकेसाठी अधिक पैशांची मागणी करणं हे बरेचदा घडतं. पण या मालिकेसाठी शिल्पा शिंदेची अट ऐकून तर निर्माते चकितच झाले होते. शिल्पाने सांगितलं होतं की, मला भूमिकेसाठी तकिया कलाम म्हणजेच हटके ओळ पाहिजे. ही अट मंजूर करत निर्मात्यांच्या मंजूरीने मालिकेच्या लेखकांनी ‘सही पकडे है’ हा तकिया कलाम तिला दिला. जो आजही प्रचंड प्रमाणात लोकप्रिय आहे आणि लोकं रोजच्या बोलण्यातही हा सर्रास वापरतात. पण आता मात्र अभिनेत्री शिल्पा शिंदे ‘भाभी जी घर पे है’ या मालिकेचा भाग नाही. तिच्याऐवजी या मालिकेत बऱ्याच शोधानंतर अभिनेत्री शुभांगी अत्रेला घेण्यात आलं. पण तिला अंगूरी भाभी म्हणून स्वीकारण्यास प्रेक्षकांना फार वेळ लागला. शिल्पाच्या जागी आता शुभांगी आहे अंगूरी भाभी मीडिया रिपोर्ट्सनुसार शिल्पा शिंदेची अंगूरी भाभीची भूमिका प्रेक्षकांनी अक्षरक्षः डोक्यावर घेतली होती. तरीसुद्धा निर्मात्यांशी झालेल्या वादानंतर 2016 साली शिल्पाने ही मालिका सोडली. अशावेळी तिची रिप्लेसमेंट म्हणून जेव्हा अभिनेत्री शुभांगी अत्रेला (Shubhangi Atre) कास्ट करण्यात आलं. तेव्हा शिल्पाने म्हटलं की, ‘ती एक चांगली कॉपी कॅट आहे. तुम्ही कोणालाही अंगूरीसारखे कपडे घालून उभं करू शकता. पण अंगूरीसारखा अभिनय करणं सोपं नाही.’ शिल्पाचा हटके अंदाज प्रेक्षकांना आवडला होता खरं तर कोणतीही भूमिका ही कलाकाराच्या हटके अभिनयामुळे जास्त लक्षात राहते. पण निर्मात्यांची समस्या तेव्हा वाढते, जेव्हा ती भूमिका करणारे कलाकार मालिकेला सोडून देतात. असंच काहीसं ‘भाभी जी घर पर हैं’ या मालिकेसोबत झालं होतं. पण काही काळातच लोकं अभिनेत्री शुभांगी अत्रेला पसंत करू लागले. एखाद्या प्रमुख पात्राला लोकप्रियता मिळाल्यावर त्यांनी मालिका सोडल्याच्या घटना टीव्हीवरील अनेक मालिकांच्या बाबतीत झाल्या आहेत. पण म्हणतात ना, ‘द शो मस्ट गो ऑन’ त्या उक्तीप्रमाणे मालिका मात्र नव्या कलाकारांसोबत सुरूच राहतात.आदिती
    First published:

    Tags: Entertainment, Tv actress

    पुढील बातम्या