• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • गोरी मेमचा रोमँटिक फोटो पाहून विभूतीने दिली अशी प्रतिक्रिया; म्हणाला...

गोरी मेमचा रोमँटिक फोटो पाहून विभूतीने दिली अशी प्रतिक्रिया; म्हणाला...

गोरी मेमनं पोस्ट केला पतीसोबतचा रोमँटिक फोटो

गोरी मेमनं पोस्ट केला पतीसोबतचा रोमँटिक फोटो

गोरी मेमनं पोस्ट केला पतीसोबतचा रोमँटिक फोटो; ऑनस्क्रीन पती विभूतीनं दिली अशी प्रतिक्रिया

 • Share this:
  मुंबई 7 ऑगस्ट: ‘भाभीजी घर पर है’ (Bhabiji Ghar Par Hai) या विनोदी मालिकेतून घराघरात पोहोचलेली सौम्या टंडन (Saumya Tandon) ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मालिकांसोबतच ग्लॅमरस लुक आणि हॉट फोटोशूटमुळे ती नेहमीच चर्चेत असते. मात्र यावेळी ती कुठल्याही बोल्ड फोटोमुळे नव्हे तर पतीसोबत काढलेल्या एका रोमँटिक फोटोमुळे चर्चेत आहे. सौम्याचा तिच्या पतीसोबतचा फोटो पाहून तिचा ऑनस्क्रीन पती विभूती याने एक गजब कमेंट केली आहे. त्याची ही कमेंट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. “मी पतीसोबत कधी फारसं फोटोशूट करत नाही. परंतु हा एक विशेष क्षण होता त्यामुळे मी हा फोटो काढला.” अशा आशयाची कमेंट करत सौम्याने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. या फोटोवर अनेक नामांकित सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या. परंतु यापैकी विभूतीने दिलेली प्रतिक्रिया सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. “तुमची जोडी फारच सुंदर दिसत आहे” अशा आशयाची कमेंट करत त्याने कौतुक केलं. अन् विभूतीने केलेलं हे कौतुक अनेक नेटकऱ्यांना आवडलेलं दिसत आहे. राज कुंद्राला पुन्हा एकदा High Courtचा झटका; आणखी खावी लागणार तुरुंगाची हवा बॉयफ्रेंड आदर जैनसोबत तारा सुतारियाने केली B'day पार्टी; कपूर कुटुंबाची होणार सून भाभीजी घर पर है या मालिकेत सौम्यानं अनिता अर्थात गोरी मेम ही व्यक्तिरेखा साकारली होती. पटकथेनुसार ती अभिनेता आसिफ शेख अर्थात विभूती नारायण याची पत्नी होती. दोघांची फार चांगली केमिट्री या मालिकेत पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर ते खऱ्या आयुष्यात देखील पती-पत्नी आहेत की काय अशी शंका प्रेक्षकांना येत होती. त्यामुळे आसिफची ही पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published: