मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: मलखानचं अपूर्ण 'हे' काम पूर्ण करणार 'अनिता भाभी'; सौम्या टंडनच्या मोहिमेत तुम्हीही होऊ शकता सहभागी

VIDEO: मलखानचं अपूर्ण 'हे' काम पूर्ण करणार 'अनिता भाभी'; सौम्या टंडनच्या मोहिमेत तुम्हीही होऊ शकता सहभागी

 'भाभीजी घर पर है' ही छोट्या पडद्यावरील प्रचंड लोकप्रिय विनोदी मालिका आहे. या मालिकेतील कलाकारांनी चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं आहे.

'भाभीजी घर पर है' ही छोट्या पडद्यावरील प्रचंड लोकप्रिय विनोदी मालिका आहे. या मालिकेतील कलाकारांनी चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं आहे.

'भाभीजी घर पर है' ही छोट्या पडद्यावरील प्रचंड लोकप्रिय विनोदी मालिका आहे. या मालिकेतील कलाकारांनी चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं आहे.

  मुंबई, 14 ऑगस्ट-   'भाभीजी घर पर है' ही छोट्या पडद्यावरील प्रचंड लोकप्रिय विनोदी मालिका आहे. या मालिकेतील कलाकारांनी चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं आहे. त्यातीलचे एक अभिनेता म्हणजे दीपेश भान होय. या अभिनेत्याची आकस्मिक एक्झिट सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली. 'मलखान'ची भूमिका साकारणाऱ्या दीपेश भान या अभिनेत्याचं जुलै महिन्यात निधन झालं होतं. शूटिंगला अजून उशीर असल्यामुळे तो क्रिकेट खेळायला गेला होता आणि खेळत असताना अचानक त्याची तब्येत बिघडली. अभिनेता बेशुद्ध पडल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं,परंतु तेथे त्याला मृत गोष्टीत करण्यात आलं. मलखान म्हणजेच दिपेश भानच्या मागे पत्नी, एक वर्षाचा मुलगा आणि कुटुंब आहे. अभिनेत्याचं घर गृहकर्जावर घेण्यात आलं होतं, ज्याचे हप्ते अद्यापही बाकी आहेत. दिपेश भानच्या निधनानंतर गृहकर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी त्यांच्या पत्नीवर आली आहे. परंतु अभिनेत्याची पत्नी एक गृहिणी आहे. तिच्याजवळ कमाईचं कोणतंही साधन उपलब्ध नाहीय.दीपेश भानच्या पत्नीच्या डोक्यावर अचानक अनेक जबाबदाऱ्या येऊन पडल्या आहेत. अशा परिस्थितीत भाभीजी घरपर है मालिकेतील जुनी अनिता भाभी म्हणजेच सौम्या टंडननं त्यांना मदत करण्याची जबाबदारी उचलली आहे.अभिनेत्रीने याबाबत एक आवाहनही केलं आहे. सौम्याने दीपेश भानच्या गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी एक उपक्रम सुरु केला आहे. सौम्याने एक फंड सुरु केला आहे आणि सर्वांना विनंती केली आहे की त्यांनी शक्य तितकं योगदान द्यावं. जेणेकरून दीपेशचं गृहकर्ज फेडता येईल. सौम्याने यासंदर्भात एक व्हिडिओही शेअर केला आहे. सोशल मीडियाच्या मदतीने अभिनेत्रीने आपल्या दिवंगत मित्रासाठी हे कार्य हाती घेतलं आहे. सौम्या टंडनने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती म्हणते- 'दीपेशआज आपल्यात नाहीय. पण, त्याच्या अनेक आठवणी आपल्यासोबत आहेत. त्याच्या अनेक गोष्टी मला आयुष्यभर आठवतील. त्याचे शब्द मला अजूनही आठवतात. तो अनेकदा त्याच्या घराबद्दल बोलत असे, जे त्याने गृहकर्ज घेऊन खरेदी केलं होतं. हे घर घेतल्यानंतरच त्यांचं लग्नदेखील झालं होतं. आणि त्यानंतर त्याला एक मुलगा झाला आहे.
  (हे वाचा:Ankita Lokhande: लेट पण थेट! अंकिता लोखंडेने सासुरवाडीत साजरं केलं पहिलं रक्षाबंधन, शेअर केले फोटो ) सौम्याने पुढं म्हटलंय,' 'दीपेश गेला, पण त्याने नेहमीच आपल्याला खूप आनंद आणि चेहऱ्यावर हास्य दिलं आहे. आता त्याची परफेड करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. आपण ते घर त्याला आणि त्याच्या मुलाला परत करु शकतो. मी एक फंड सुरु केला आहे. ज्यामध्ये येणारा सर्व पैसा त्याच्या पत्नीकडे जाईल. या निधीतून तिला गृहकर्जाची परतफेड करता येणार आहे. कृपया रक्कम छोटी असो वा मोठी आपण सर्वांनी मदत करा. आपण मिळून त्याचं स्वप्न पूर्ण करु शकतो.अशी भावनिक साद अभिनेत्रीने घातली आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Tv actors

  पुढील बातम्या