शुभांगी अत्रे सध्या 'भाभीजी घरपर है' या मालिकेतून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. तिला या मालिकेने एक खास ओळख दिली आहे. या मालिकेची लोकप्रियता प्रचंड आहे. तिला या मालिकेत अंगुरीची भूमिका ऑफर झाली होती. ही ऑफर तिने लगेचच मान्य केली होती. या भूमिकेमुळे आज ती घराघरात पोहोचली आहे. तिने या मालिकेत अभिनेत्री शिल्पा शिंदेला रिप्लेस केलं आहे. याआधीही यीन 'चिडिया घर' मध्ये शिल्पा शिंदेची जागा घेतली होती. 'भाभीजी घरपर है' ही एक विनोदी मालिका आहे. या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा प्रसिद्ध झाली आहे. प्रेक्षक सर्व पात्रांना भरभरून प्रेम देत असतात. त्यातल्या त्यात अंगुरी भाभीला जास्तच. तिच्या निरागस विनोदाने प्रेक्षक खळखळून हसतात. आज शुभांगी अत्रे एका एपिसोडसाठी तब्बल 40 ते 50 हजार रुपये मानधन घेते. अशाप्रकारे ती महिन्याकाठी लाखो रुपये कमावते.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Tv actress