Home /News /entertainment /

'भाभी जी घर पर हैं' फेम हप्पू सिंहला एका एपिसोडसाठी मिळतात तब्बल इतके रुपये, जाणून वाटेल आश्चर्य

'भाभी जी घर पर हैं' फेम हप्पू सिंहला एका एपिसोडसाठी मिळतात तब्बल इतके रुपये, जाणून वाटेल आश्चर्य

'भाभी जी घर पर हैं' (Bhabhiji Gharpar Hai) मालिकेतील हप्पू सिंहची भूमिका साकारणाऱ्या योगेश त्रिपाठी या अभिनेत्याने सर्वांवर आपली छाप पाडली आहे.

    मुंबई, 18 मार्च-   'भाभी जी घर पर हैं'   (Bhabhiji Gharpar Hai)  ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी मालिका म्हणून ओळखली जाते. 2015 पासून ही मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेतील प्रत्येक विनोदी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अंगूरी भाभी (Anguri), विभूती नारायण मिश्रा (Vibhuti Narayan Mishra), मनमोहन तिवारी (Manmohan Tiari)आणि पोलीस हप्पू सिंह  (Happu Singh)  असं प्रत्येक पात्र प्रेक्षकांनाआपलंस वाटतं. हे कलाकार आपल्या दमदार अभिनयाने सर्वांनाच पोट धरून हसायला भाग पाडतात. यातील हप्पू सिंहची भूमिका साकारणाऱ्या योगेश त्रिपाठी या अभिनेत्याने सर्वांवर आपली छाप पाडली आहे. आज आपण या अभिनेत्याबद्दलच जाणून घेणार आहोत. अभिनेता योगेश त्रिपाठीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांच्या अभिनय कारकिर्दीचा प्रवास खूप कठीण होता. सुरुवातीला त्यांनी कामासाठी अनेक प्रॉडक्शन हाऊसमध्ये पालथे घातले होते. दोन वर्षांच्या कारकिर्दीनंतर त्यांना अनेक जाहिरातींमध्ये काम करण्याची संधी मिळाली. परंतु त्यामुळे त्यांना विशेष अशी ओळख मिळाली नाही. त्यांनतर योगेश त्रिपाठीला लोकप्रिय कॉमेडी शो एफआयआरमध्ये काम करण्याची संधी मिळाली. या शोमधील त्यांची अभिनय क्षमता पाहून दिग्दर्शक शशांक बाली यांनी त्याला 'भाभीजी घर पर हैं' मध्ये कास्ट केलं. परंतु केवळ एक प्रयोग म्हणून हप्पू सिंहला या शोमध्ये घेण्यात आल्याचं त्यांना सांगण्यात आलं होतं. या शोच्या निर्मात्यांनी ठरवलं होतं की, जर प्रेक्षकांना हप्पू सिंहची व्यक्तिरेखा आवडली तरच ती पुढे ठेवली जाईल, अन्यथा या पात्राला शोमधून काढून टाकले जाईल.पण पहिल्याच दिवसापासून लोकांना हप्पू सिंहची व्यक्तिरेखा इतकी आवडली की ही व्यक्तिरेखा आता शोचा मुख्य भाग बनली आहे. (हे वाचा:HOLI 2022: 'या' बॉलिवूड सेलेब्रेटींना वाटते रंगांची भीती, होळीपासून राहतात दूर ) आज योगेश त्रिपाठीला लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व लोक हप्पू सिंह म्हणून ओळखतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, योगेश त्रिपाठीला हप्पू सिंहच्या भूमिकेसाठी एका एपिसोडला सुमारे 35,000 रुपये मिळतात.असं म्हटलं जातं की, योगेश त्रिपाठीच्या कुटुंबीयांना त्यांना अभिनय क्षेत्रात पाठवायचं नव्हतं, कारण त्यांच्या घरातील बहुतेक लोक शिक्षकी व्यवसायाशी संबंधित आहेत. परंतु ते त्यांच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध या क्षेत्रात आले आहेत.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Actor, Entertainment, Tv shows

    पुढील बातम्या