मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bhabi Ji Ghar Par Hai: धक्कादायक 'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्याच्या मुलाचं अवघ्या 19 वर्षी निधन

Bhabi Ji Ghar Par Hai: धक्कादायक 'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्याच्या मुलाचं अवघ्या 19 वर्षी निधन

 Bhabi Ji Ghar Par Hai

Bhabi Ji Ghar Par Hai

टेलिव्हिजन विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'भाबी जी घर पर है' फेम अभिनेता जितू गुप्ता यांच्या मुलाचे निधन झाले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 28 सप्टेंबर : टेलिव्हिजन विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'भाबी जी घर पर है' फेम अभिनेता जितू गुप्ता यांच्या मुलाचे निधन झाले आहे. जितू गुप्ता यांच्या मुलाचे नाव आयुष असून तो फक्त 19 वर्षांचा होता.  जीतू यांच्यावर काळानं घाला घातला असून त्यात मुलाच्या निधनानं त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोशल मीडियावर निधनाची बातमी व्हायरल होताच चाहत्यांनी जीतू यांच्याप्रती सहानुभूती दर्शवली आहे. याशिवाय टीव्ही मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रेटींनी देखील ट्विट करुन आयुषला श्रद्धांजली वाहिली आहे. कॉमेडियन सुनील पाल यांनी आयुषच्या मृत्यूची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. यावेळी त्यांना जीतू गुप्ता यांच्या मुलाचीही आठवण झाली.

सुनील पाल यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून आयुषच्या मृत्यूची दुःखद बातमी दिली आहे. यासोबत त्यांनी भावनिक कॅप्शनही लिहिले. आयुषची आठवण करून, कॉमेडियनने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'RIP, भाबी जी घर पर है अभिनेता, आयुष (19 वर्ष) माझ्या मित्राचा मुलगा जीतू आता राहिला नाही.' सुनील पाल यांनी त्याच्या कॅप्शनमध्ये खूप रडण्याचे इमोजी देखील आहेत. आपल्या मित्राच्या मुलाच्या मृत्यूने त्यांना मोठा धक्का बसल्याचे या गोष्टीवरून स्पष्ट होत आहे.

हेही वाचा - Ekta Kapoor: एकता-शोभा कपूरविरुद्ध वॉरंट जारी; होणार अटक?

आयुष गुप्ता बराच काळ रुग्णालयात दाखल होता आणि ही माहिती त्याचे वडील आणि अभिनेता जीतू गुप्ता यांनी सोशल मीडियावर दिली. त्यांनी आपल्या मुलाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, जो पाहून कोणाचेही डोळे ओले व्हावेत. या फोटोसोबत अभिनेत्याने लिहिले होते कि,  'मुलगा आयुषबद्दलची पोस्ट वाचल्यानंतर, तुम्ही सर्व त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सतत फोन येत आहेत, परंतु हात जोडून विनंती आहे की, फक्त तुमचे आशीर्वाद आणि देवाकडे प्रार्थना करा, कारण यावेळी त्याची प्रकृती खूपच गंभीर आहे. मी अजिबात बोलण्याच्या स्थितीत नाही आणि इतके कॉल उचलणंही शक्य नाही.'

या अभिनेत्याचे चाहते आणि प्रेक्षक आता त्यांना सहानुभूती देण्याचा प्रयत्न करत आहेत.

First published:

Tags: Entertainment, Tv actor