मुंबई, 30 सप्टेंबर- भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याकडं पाहिलं जातं. अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती'(Kaun Banega Crorepati 13) या शोचा तेरावा सिझन होस्ट करताना दिसत आहेत. दर शुक्रवारी 'फन्टॅस्टिक फ्रायडे'(शानदार शुक्रवार) या नावाअंतर्गत या कार्यक्रमाचा एक विशेष भाग प्रसारित केला जातो. यानिमित्त विविध क्षेत्रांतील सेलिब्रेटी ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर हजेरी लावतात. येत्या शुक्रवारी पाहुणे म्हणून अभिनेता पंकज त्रिपाठी(Pankaj Tripathi) आणि प्रतीक गांधी(Pratik Gandhi) हॉटसीटवर बसलेले दिसणार आहेत. पाहुण्यांसोबत गप्पा मारताना मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट शेअर केला आहे. चित्रपटसृष्टीत त्यांना अभिनेता म्हणून कसं स्वीकारलं गेलं याबाबतचा एक किस्सा अमिताभ यांनी पाहुण्यांना सांगितला आहे.
'केबीसी 13' चा 'शानदार शुक्रवार' हा भाग 1 ऑक्टोबर रोजी सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवरून प्रसारित होईल. पंकज त्रिपाठी आणि प्रतीक गांधी यांनी या खेळात कमवलेली रक्कम सामाजिक कार्यासाठी दिली जाणार आहे. त्यांच्याशी गप्पा मारताना अमिताभ बच्चन यांनी, एकदा त्यांना पेट्रोल पंपावर लोकांनी कसं ओळखलं होतं, हा किस्सा सांगितला आहे. ती पहिलीचं वेळ होती जेव्हा त्यांना चित्रपटांमध्ये केलेल्या कामामुळे लोकांनी ओळखलं होतं.
(हे वाचा:Freddy: कार्तिक आर्यनने चित्रपटाचं शूटिंग केलं पूर्ण; सेटवरील PHOTO शेअर करत....)
तेव्हा बिग बींनी(Big B) आनंद(Ananad) चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. तेव्हा त्यांच्यांकडे स्वत:ची गाडी नव्हती म्हणून त्यांनी मित्राची कार घेतली होती. त्यात पेट्रोल टाकण्यासाठी देखील पैसे नव्हते. कुणाकडून तरी 5 ते 10 रुपये उसने घेऊन त्यांनी जवळच्या पेट्रोल पंपावर जाऊन गाडीत पेट्रोल भरलं होतं. हा किस्सा ज्या दिवशी 'आनंद' रिलिज होणार होता त्या दिवशीचा आहे. आनंद रिलिज झाल्यानंतर पुन्हा एक दिवस सकाळी एका दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी जात असताना अमिताभ यांच्या कारमधील पेट्रोल संपलं होतं. ते पुन्हा त्याच पेट्रोल पंपावर गेले. यावेळी मात्र, 4 ते 5 लोक त्यांना पाहत होते. तेव्हा आपल्या कामामुळं आपल्याला लोक ओळखू लागले आहेत याची पहिल्यांदा जाणीव झाल्याचं अमिताभ यांनी सांगितलं.
(हे वाचा:JUST IN: 'गंगूबाई काठियावाडी'ची रिलीज डेट Out; नववर्षात आलिया भट्टचा धमाका)
अमिताभ बच्चन आगामी काळात अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. त्यांनी नागराज मंजुळे याच्या 'झुंड' आणि धर्मा प्रॉडक्शनच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे. तसेच 'मेडे' आणि 'गुड बाय'चा देखील काही मुख्य भाग शूट केला आहे. याशिवाय, दीपिका पदुकोणसोबत 'द इंटर्न' चित्रपटातही अमिताभ एक विशेष पात्र साकारताना दिसणार आहेत. कायम कामात व्यस्त असलेले बिग बी सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असतात. ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ब्लॉगवर कायम ते आपल्या चाहत्यांसाठी काही ना काही शेअर करत असतात. यातून ते आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amitabh Bachchan, Entertainment, KBC