मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ड्रग्ज प्रकरणात आता विवेक ओबेरॉयच्या घरावरही धाड; पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

ड्रग्ज प्रकरणात आता विवेक ओबेरॉयच्या घरावरही धाड; पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

ड्रग्ज (drug) प्रकरणात पोलीस सर्च वॉरंट घेऊन विवेक ओबेरॉयच्या (vivek oberoi) घऱी पोहोचलेत.

ड्रग्ज (drug) प्रकरणात पोलीस सर्च वॉरंट घेऊन विवेक ओबेरॉयच्या (vivek oberoi) घऱी पोहोचलेत.

ड्रग्ज (drug) प्रकरणात पोलीस सर्च वॉरंट घेऊन विवेक ओबेरॉयच्या (vivek oberoi) घऱी पोहोचलेत.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 15 ऑक्टोबर : ड्रग्ज (drugs) प्रकरणात आता अभिनेता विवेक ओबेरॉयच्या (Vivek Oberoi) घरावरही धाड टाकण्यात आली आहे. सँडलवूड ड्रग्ज प्रकरणात (sandalwood drug scandal) विवेकचा मेहुणा आदित्य अल्वाचं (Aditya Alva) नाव आहे. तो सध्या गायब असल्याने आता त्याच्या तपासासाठी बंगलुरू पोलीस (bengaluru police) मुंबईत आले आहेत आणि त्यांनी विवेक ओबेरॉयच्या घरात तपास सुरू केला आहे. विवेक ओबेरॉयच्या बायकोचा भाऊ आदित्य अल्वा  हा बंगळुरू ड्रग्ज प्रकरणात आरोपी आहे. आदित्य हा कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांचा मुलगा आहे. हाय प्रोफाइल पार्टीमधील तो एक लोकप्रिय चेहरा आहे. प्रकरण उघडकीस आल्यापासून आदित्य गायब आहे. त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे. तो विवेकच्या घरात असल्याची माहिती बंगळुरू पोलिसांना मिळाली. त्यामुळे बंगळुरू पोलीस मुंबईत आले. आदित्य अल्वा गायब आहे. तो विवेक ओबेरॉयचा नातेवाईक आणि त्याच्या घरी आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली. त्यामुळे त्याचा तपास करण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत, असं बंगळुरू पोलिसांनी सांगितलं. बंगळुरू पोलीस सर्च वॉरंट घेऊन विवेक ओबेरॉयच्या जुहूतील घरात पोहोचले. दोन पोलीस दुपारी एक वाजता विवेकच्या घरी दाखल झाले. तेव्हापासून त्याच्या घरात तपास केला जातो आहे. हे वाचा- वाह संजूबाबा मानलं तुला ! म्हणला, "कॅन्सरशी जिद्दीने झुंज देणार" पाहा VIDEO फक्त बॉलिवूडच नव्हे तर सँडलवूड ड्रग्ज कनेक्शनही समोर आलं. कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटीही ड्रग्जचं सेवन करतात आणि व्यवहार करत असल्याचं तपासात उघडकीस आलं. याप्रकरणी केंद्रीय गुन्हे शाखेकडून (CCB) चौकशी सुरू आहेत. याआधी अभिनेत्री रागिनी द्विवेदीसह आणखी काही जणांना अटक करण्यात आली आहे.
First published:

Tags: Bollywood

पुढील बातम्या