Home /News /entertainment /

टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का, प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का, प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

मनोरंजनसृष्टीवर पुन्हा एकदा दुःखाचं सावट पसरलं आहे.

    मुंबई, 24 मार्च- मनोरंजनसृष्टीवर पुन्हा एकदा दुःखाचं सावट पसरलं आहे. प्रसिद्ध बंगाली अभिनेते अभिषेक चॅटर्जी (Abhishek Chatrjee)  यांचं दुःखद निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 56 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी रात्री उशिरा एका रिएलिटी शोचं शूटिंग संपवून ते घरी आले. त्यांनतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांची प्रकृती अचानक बिघडली. आणि काही वेळेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने मनोरंजनसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टॉलिवूड म्हणजेच बंगाली टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार अभिषेक चॅटर्जी हे बुधवारी रात्री शूटिंगवरून परतल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. घरी आल्यानंतर त्यांना उलट्या झाल्या, मात्र त्यांनी रुग्णालयात जाण्यास नकार दिला. त्यांनतर त्यांना घरीच सलाईन लावण्यात आलं. मात्र, त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अभिषेक चॅटर्जी हे बंगाली टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय चेहरा होता.त्यांनी 'इच्छादी', 'पिता', 'अपूर सांगा', 'अंदरमहल', 'कुसुम डोला', 'फागुन बू', 'खारकुटो' यांसारख्या मालिकांमधील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने बंगालच्या मनोरंजन विश्वात शोककळा पसरली.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Actor, Entertainment

    पुढील बातम्या