मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /तिसऱ्या घटस्फोटाच्या तयारीत आहे 'ही' अभिनेत्री; नवऱ्यावर केले गंभीर आरोप

तिसऱ्या घटस्फोटाच्या तयारीत आहे 'ही' अभिनेत्री; नवऱ्यावर केले गंभीर आरोप

प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री श्राबंती चॅटर्जी (Srabanti Chatterjee )केवळ तिच्या चित्रपटांसाठीच नव्हे तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.

प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री श्राबंती चॅटर्जी (Srabanti Chatterjee )केवळ तिच्या चित्रपटांसाठीच नव्हे तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.

प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री श्राबंती चॅटर्जी (Srabanti Chatterjee )केवळ तिच्या चित्रपटांसाठीच नव्हे तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.

कोलकाता, 29 सप्टेंबर : प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री श्राबंती चॅटर्जी  (Srabanti Chatterjee ) केवळ तिच्या चित्रपटांसाठीच नव्हे तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. आता तिच्या बाबतीत एक नवीन माहिती समोर आलेली आहे. श्राबंती चॅटर्जी तिचे तिसरे लग्न   (Srabanti Chatterjee Divorce) देखील लवकरच मोडणार असल्याची बातमी समोर आली आहे. श्राबंती चॅटर्जीने पती रोशन सिंगकडून घटस्फोट पाहिजे आहे त्यासाठी तिने न्यायालयात अर्ज केला आहे. यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री श्राबंती चॅटर्जी 34 वर्षाची आहे. तिने 1997 मध्ये चित्रपट क्षेत्रामध्ये पदार्पण केलं होतं. श्राबंतीनं आतापर्यत एक नव्हे दोन नव्हे तीन लग्न केली आहेत. तिचं पहिलं लग्न हे बंगाली फिल्ममेकर राजीव कुमार यांच्यासोबत 2003 सालीमध्ये झालं होते. 2016 मध्ये तिनं राजीवकडून काडीमोड घेतला. त्यानंतर तिनं कृष्ण ब्रजसोबत लग्नगाठ बांधली. हे लग्न कसं तरी एक वर्ष हे टिकलं. यानंतर श्राबंतीनं एप्रिल 2019 मध्ये रोशन सिंग यांच्याशी लग्न केलं. आता त्यांच्यासोबतही घटस्फोट घेण्याच्या तयारीत ती आहे.

माहितीनुसार श्राबंतीनं 16 सप्टेंबरला कोर्टात रोशन सिंग यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये तिनं आपल्याला त्याच्याकडून घटस्फोट हवा असल्याचं म्हटलं आहे. तर रोशन यांनी अजून आपल्याला कोणत्याही प्रकारची नोटीस मिळालेली नाही. मात्र जर ती मिळाली तर त्यावर योग्य तो विचार करुन उत्तर देऊ असं सांगितलं.

हे वाचा - Samantha Akkineni खरंच मुंबईला शिफ्ट होणार? अभिनेत्रीने लाइव्ह येत दिलं उत्तर

या सगळ्या प्रकरणावर एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत रोशन सिंग म्हणाले,  श्राबंती ही तिच्या अनेक मित्रांच्या संपर्कात आहे आणि त्या मित्रांमध्ये तिनं माझ्याविषयी अनेक गोष्टी पसरवल्या आहेत ज्यामुळे मी अनेकदा अडचणीत देखील आलो आहे. त्याविषयी तिला विचारणा केली असता त्याबद्दल आपण असं काही केलंच नसल्याचं ती सांगते. त्यामुळे अनेकदा आमच्यात वादही झाले आहेत.असल्याचे त्यांनी सांगितलं.

रोशन पुढे म्हणाले की,  आमच्यातील फिजिकल रिलेशनशिपविषयी तिनं काही गोष्टी सोशलाईज केल्या . मी खूप जाड आहे म्हणून सेक्स करू शकत नाही, असं ती लोकांना सांगत असल्याचं देखील मला समजलं आहे. माझ्या एक्स गर्लफ्रेण्डला कॉल करून ती अनेक तक्रारी करते.

श्राबंती चटर्जीने या वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर तिने भाजपच्या तिकिटावर बेहाला पश्चिममधून विधानसभेची निवडणूकही लढवली. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे नेते पार्थ चॅटर्जी यांच्याकडून ती पराभूत झाली.

हे वाचा - नवा प्रवास म्हणत सायकलवर झाला स्वार; कुठे निघालाय उमेश कामत?

श्राबंतीच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे तर ती आशुमन प्रत्युषच्या सायकोलॉजिकल 'धप्पा' या सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत प्रियांका सरकारही दिसणार आहे. याशिवाय श्रबंती 'बीरपुरुष', 'नबजीबन इन्शुरन्स कंपनी', 'कबेरी अंतर्धन', 'खेलाघोर', 'अचणे उत्तम' या सिनेमात देखील दिसणार आहे.

First published:
top videos

    Tags: Actress, Entertainment