एस्कॉर्ट सर्व्हिसच्या पोस्टरवर अभिनेत्रीचा फोटो; पुढे जे काही झाले ते...

तुम्ही एस्कॉर्ट सर्व्हिस देता का? तुमचे दर काय आहेत? असे विचित्र प्रश्न विचारणारे फोन एका पाठोपाठ येऊ लागल्याने बृष्टीला धक्काच बसला.

News18 Lokmat | Updated On: Sep 3, 2019 08:40 PM IST

एस्कॉर्ट सर्व्हिसच्या पोस्टरवर अभिनेत्रीचा फोटो; पुढे जे काही झाले ते...

नवी दिल्ली, 03 सप्टेंबर: तुम्ही एस्कॉर्ट सर्व्हिस देता का? तुमचे दर काय आहेत? असे विचित्र प्रश्न विचारणारे फोन एका पाठोपाठ येऊ लागल्याने बृष्टीला धक्काच बसला. जेव्हा याबाबत चौकशी केली तेव्हा मात्र बृष्टीच्या पायाखालची जमीनच सरकली. काही दिवसांपूर्वी बंगाल चित्रपटातील अभिनेत्री बृष्टी रॉय (Brishti Roy) हिला एक धक्कादायक अनुभव आला. एस्कॉर्ट सर्व्हिस (कॉल गर्ल) देणाऱ्या पोस्टरवर बृष्टीचा अभिनेत्रीचा फोटो आणि नंबर छापण्यात आला. यानंतर तिला अनेक लोकांचे फोन येऊ लागले. हे सर्व लोक एस्कॉर्ट सर्व्हिस संदर्भात बृष्टीला विचारणा करत होते.

बंगाली अभिनेत्री बृष्टीचा फोटो आणि नंबर कोलकाता शहरातील लोकल रेल्वे आणि स्थानकावर लावण्यात आले होते. गेल्या 10 दिवसांपासून बृष्टीला अनेक जणांचे फोन येते होते. हे सर्व फोन एस्कॉर्ट सर्व्हिस संदर्भात येत होते. सुरुवातीला तिला हा प्रकार काही लक्षात आला नाही. पण दोन दिवसांनी एका मित्राने दिला पोस्टर संदर्भात माहिती दिली आणि बृष्टीला एकच धक्का बसला. 24 ऑगस्टपासून अनोळखी नंबरवरून मला फोन येत होते. सुरुवातीला मला वाटले की हे स्पॅम कॉल असतील. काही फोन मी उचलले तेव्हा त्यांनी मला एस्कॉर्ट सर्व्हिससंदर्भात विचारणा केली. तिसऱ्या दिवशी एका मित्राकडून मला पोस्टर संदर्भात सांगितले. या पोस्टरवर माझा फोटो आणि नंबर छापण्यात आला होता. माझ्या मित्राने संबंधित पोस्टरचा फोटो मला पाठवला. पोस्टर पाहून मला धक्काच बसल्याचे बृष्टीने सांगितले. त्यानंतर देखील मला फोन येत होते. फोन करणारे सर्व जण अश्लील भाषेत बोलत असल्याचे बृष्टी म्हणाली.

सध्या बंगाली छोट्या पडद्यावर काम करणारी बृष्टीने अनेक चित्रपटात देखील काम केले आहे. या सर्व प्रकारावर बोलताना बृष्टी म्हणाली, सातत्याने येणाऱ्या फोनमुळे मी नंबर बदलण्याचा विचार केला होता. पण आता तेही शक्य नाही. कारण पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. माझे सर्व काम या नंबरवरच असल्यामुळे एका रात्रीमध्ये मी नंबर बदलू शकत नाही. या प्रकरणी दोषी व्यक्तीला पोलिस लवकरच अटक करतील अशी आशा असल्याचे बृष्टी म्हणाली.

या प्रकरणाचा तपास सोनारपूर पोलिस करत आहेत. पोस्टरवर नंबर आणि फोटो कोणी छापला याची चौकशी सुरू आहे. पण अद्याप कोणाला अटक केली नसल्याचे अधिक्षक राशिद खान यांनी सांगितले.

Loading...

प्रेम करण्याची शिक्षा, तरुणीला अर्धनग्न करून रस्त्यावर बेदम मारहाण, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 3, 2019 08:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...