S M L

भीषण कार अपघातात बंगाली माॅडेल सोनिका चौहानचा मृत्यू

या कार अपघातात बंगाली अभिनेता बिक्रम चटोपाध्याय गंभीर जखमी झालाय

Sachin Salve | Updated On: Apr 29, 2017 04:57 PM IST

भीषण कार अपघातात बंगाली माॅडेल सोनिका चौहानचा मृत्यू

29 एप्रिल : कोलकातामध्ये एका भीषण कार अपघातात बंगाली अभिनेता बिक्रम चटोपाध्याय गंभीर जखमी झालाय. तर त्याच्यासोबत असलेली माॅडेल सोनिका चौहानचा मृत्यू झालाय. आज शनिवारी सकाळी लेक माॅलजवळ हा भीषण अपघात झाला.

न्यूज 18 बांगलाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता बिक्रम स्वत: पांढऱ्या रंगाची टोयाटा जिसका गाडी चालवत होते. तेव्हा अचानक रस्त्यावर खड्डासमोर आल्यामुळे त्याचा गाडीवर ताबा सुटला आणि फुटवाथवर जाऊन गाडी आदळली. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार हा अपघात इतका भीषण होता की गाडी 180 डिग्रीमध्ये गाडीने पलटी खालली.

समोरच्या सीटवर बसलेली लोकप्रिय माॅडेल सोनिका सिंह चौहान हीच जागीच मृत्यू झाला. तर विक्रम गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर इजा झालीये. त्याला रूबी हाॅस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 29, 2017 04:57 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close