मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

OMG! ऑनस्क्रिन मुलालाच डेट करतेय 'नागिन 4'ची अभिनेत्री

OMG! ऑनस्क्रिन मुलालाच डेट करतेय 'नागिन 4'ची अभिनेत्री

नागिन 4च्या या अभिनेत्रीनं तिच्या तिच्या रिलेशनशिपची कबुली नुकतीच एका मुलाखतीत दिली.

नागिन 4च्या या अभिनेत्रीनं तिच्या तिच्या रिलेशनशिपची कबुली नुकतीच एका मुलाखतीत दिली.

नागिन 4च्या या अभिनेत्रीनं तिच्या तिच्या रिलेशनशिपची कबुली नुकतीच एका मुलाखतीत दिली.

  • Published by:  Megha Jethe
मुंबई, 14 मार्च : बॉलिवूड असो वा टीव्ही इंडस्ट्री. या ठिकाणी अनेकदा कलाकार त्यांच्या खासगी जीवनामुळे खूप चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या अफेअर्सच्या चर्चाच जास्त होतात. सध्या अशीच एक अभिनेत्री तिच्या ऑनस्क्रीन मुलाला डेट करत असल्यानं चर्चेचा विषय ठरली आहे. नागिन 4ची अभिनेत्री अपर्णा कुमारनं तिच्या या रिलेशनशिपची कबुली नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिली. अपर्णा कुमार आणि बेइंतहा फेम अभिनेता हर्षद चोप्रा एकमेकांना डेट करत आहेत. 2018 मध्ये एक मालिकेत काम करत असताना या दोघांमधील जवळीक वाढली. या मालिकेत अपर्णा आईची तर हर्षद तिच्या मुलाची भूमिका साकारली होती. अपर्णानं नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर होळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिच्यासोबत हर्षद सुद्धा दिसत आहे. या फोटोंमध्ये अपर्णाच्या भांगात सिंदूर सुद्धा पाहायला मिळत आहे. ज्यामुळे त्यांनी गुपचूर लग्न केल्याचा अंदाज लावला जात होता. आमिरला KISS करण्यास जुहीनं दिला होता नकार, 'या' व्यक्तीमुळे झाली तयार
या विषयी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोलताना अपर्णा म्हणाली, हो आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. पण आमचं लग्न झालेलं नाही. या फोटोंमध्ये जो सिंदूर दिसत आहे. तो माझ्या आत्ताच्या शोचा मेकअप आहे. जेव्हा आम्ही लग्न करु त्यावेळी सर्वांना नक्कीच सांगू. जानेवारीमध्ये हर्षदनं अपर्णाचा फोटो शेअर करत या नात्याबाबत हिंट दिली होती. संभाजीराजेंच्या आक्रमक भूमिकेनंतर 24 तासांत निलेश साबळेंचा माफीनामा
View this post on Instagram

Hello Istanbul #turkey #istanbul

A post shared by Harshad Arora (@harshadaroraoficial) on

टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार हर्षद आणि अपर्णा 2018 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 2018 मध्ये स्टार भारतवर आलेल्या ‘मायावी मलंग’ या शोमध्ये या दोघांनी काम केलं होतं. यात या दोघांनी आई-मुलाची भूमिका साकारली होती. या शोच्या शूटिंग दरम्यानही हे दोघं एकत्र दिसत असत. सध्या हर्षद सोनी सब वरील 'तेरा क्या होगा आलिया' या मालिकेत काम करत आहे. आणखी एका मावळ्याचा इतिहास मोठ्या पडद्यावर, ‘सरसेनापती हंबीरराव’चं पोस्टर रिलीज
First published:

Tags: Bollywood, Tv actors

पुढील बातम्या