स्टेशनवर गाणं गाणाऱ्या रानू मंडलला या व्यक्तीनं बनवलं फेमस, कोण आहे ‘तो’

स्टेशनवर गाणं गाणाऱ्या रानू मंडलला या व्यक्तीनं बनवलं फेमस, कोण आहे ‘तो’

रेल्वे स्टेशनवर गाणं गाणारी रानू मंडल फेमस होण्यामागे हिमेश रेशमिया नाही तर या व्यक्तीचा हात आहे.

  • Share this:

मुंबई, 25 ऑगस्ट : कोणाची नशीब कधी बदलेल हे काही सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या रानू मंडलच्या बाबतीतही काहीसं असंच घडलं आहे. कधी रेल्वे स्टेशनवर गाणं गात भीक मागणाऱ्या रानू आज बॉलिवूडसाठी गाणं गातेय. रानूच्या आवाजानं आज अनेकांना भूरळ घातली आहे. जिथे पाहावं तिथे आज रानूच्या आवाजाची चर्चा आहे. हिमेश रेशमियानं तिला आपल्या सिनेमासाठी गाण्याची ऑफर दिली आणि तिचं आयुष्य बदललं मात्र त्याआधी एक व्यक्ती रानूच्या आयुष्यात देवदूत बनून आली आणि ती अचानक प्रसिद्धीच्या झोतात आली. त्या व्यक्तीनं तिचा पहिला व्हिडीओ शूट केला. जो तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.

रानू पश्चिम बंगालच्या रानाघाट स्टेशनव गाणं गाऊन स्वतःचं पोट भरत असे. अनेक लोकांनी तिचं गाणं ऐकलं काहीनी तिचं कौतुक केलं तर काहींनी तिला पाहून तिच्याकडे दुर्लक्ष केलं. रानू नेहमी जुनी गाणी गात असे. तिचा पहिला व्हिडीओ व्हायरल झाला त्यात ती लता मंगेशकर यांचं ‘एक प्यार का नगमा’ हे गाणं गात होती. पण तिचं हे गाणं व्हायरल होण्यामागे हात होता तो एतींद्र चक्रवर्ती नावाच्या एका तरुणाचा. जेव्हा रानू गाणं गात होती, त्यावेळी एतींद्र त्या ठिकाणी होता. त्यानं सहज म्हणून तिचा व्हिडीओ बनवला आणि आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. जो पुढे खूप व्हायरल झाला आणि फेमसही.

कार्तिकसोबत सारा अली खान पोहोचली हॉस्पिटलमध्ये, 'हे' आहे कारण

एतींद्रने रानू यांचा व्हिडीओ त्याच्या फेसबुक अकाउंटवर शेअर केला आणि रानूचं आयुष्य बदलत गेलं. त्यानंतर आता हिमेश रेशमियानं रानूला त्याच्या सिनेमासाठी गाण्याची ऑफर दिली. रानूच्या गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू असताना एतींद्र सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होता. त्यानं कधी कल्पनाही केली नसेल की त्याचा एक व्हिडीओ एका महिलेचं आयुष्य अशाप्रकारे बदवून टाकेल. रानूला ही संधी दिल्याबद्दल एतींद्रने हिमेशचे आभार मानले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एतींद्र सतत रानूच्या संपर्कात आहे. तो व्यावसायानं सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे आणि रानाघाटमध्येच राहतो.

बॉलिवूडच्या 'हसीना', ज्यांनी आपल्या नॅचरल ब्युटीनं अनेकांना केलं घायाळ!

हिमेश रेशमियाचा आगामी सिनेमा हॅप्पी हार्डी अँड हीर आहे. ज्यात रानू मंडलने ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणं गायलं आहे. याचा व्हिडीओ हिमेशनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. ज्यात रानू स्टुडिओमध्ये हिमेशसोबत गाण्याचं रेकॉर्डिंग करताना दिसत आहे. तर हिमेश तिच्या बाजूला उभा राहून तिला गाइड करत आहे.

सई ताम्हणकरचं नवं फोटोशूट Viral, तुम्ही पाहिला का तिचा पैठणी लुक?

==================================================================

VIDEO: पुण्यातील प्लॅस्टिकच्या गोडाऊनमध्ये अग्नितांडव!

Published by: Megha Jethe
First published: August 25, 2019, 12:43 PM IST

ताज्या बातम्या