मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Varun-Natasha Wedding: वेडिंग वेन्यूवर पोहचण्याआधी वरुण धवनच्या गाडीला अपघात

Varun-Natasha Wedding: वेडिंग वेन्यूवर पोहचण्याआधी वरुण धवनच्या गाडीला अपघात

 बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल (Natasha Dalal) आज विवाह बंधनात अडकणार आहेत.

  • Published by:  Karishma
मुंबई, 24 जानेवारी : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल (Natasha Dalal) आज विवाह बंधनात अडकणार आहेत. वरुण-नताशाच्या लग्नासाठी दोन्ही कुटुंब आणि काही मित्र परिवार शुक्रवारी अलिबागमध्ये पोहचले आहेत. वरुण धवन काही कारणास्तव शनिवारी अलिबागमध्ये पोहचला. परंतु शनिवारी वरुण धवन जुहूतून अलिबागमध्ये येताना त्याच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अलिबागमध्ये ट्रॅफिक आणि रस्ते काही ठिकाणी अरुंदही आहेत. त्याचवेळी रस्त्यात छोटासा अपघात झाला. या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. गाडीला डेंट आल्याची माहिती आहे. परंतु वरुणसह गाडीतील सर्वजण सुखरुप आहेत.

(वाचा - Varun Dhawan आणि Natasha Dalal च्या लग्नाला बॉलिवूडकरांची हजेरी)

नताशा दलाल (Natasha Dalal) आणि वरुण धवन (Varun Dhawan) यांचा लग्नसोहळा सासवने येथील 'द मॅन्शन हाउस' मध्ये पार पडणार आहे. आज वरुण-नताशा लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नासाठी काही 50 लोक येणार असल्याची माहिती आहे. डेविड धवन यांनी दोघांच्या लग्नासाठी खास व्यवस्था केली आहे. सुरक्षेसह पाहुण्याच्या प्रायव्हसीचीही कडक सुविधा करण्यात आली आहे.

(वाचा - बॉलिवूडच्या खलनायकापासून ते चांदणीपर्यंत अनेक कलाकारांनी उरकली गुपचूप लग्न)

लग्नात काही लोकच सामिल होणार आहेत. सलमान खान, शाहरुख खान आणि अर्जुन कपूर या कलाकारांची नाव त्यात आहेत. लग्नात सामिल होणाऱ्या लोकांची कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. 24 जानेवारी लग्नानंतर, रिसेप्शन ठेवण्यात आलं असून त्यासाठी बॉलिवूडच्या तमाम स्टार्सला बोलवण्यात आलं असल्याची माहिती आहे.
First published:

पुढील बातम्या