मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आलियाशी लग्न करण्यापूर्वी रणबीरला साइन करावा लागला 'हा' कॉन्ट्रॅक्ट,आता झाला खुलासा

आलियाशी लग्न करण्यापूर्वी रणबीरला साइन करावा लागला 'हा' कॉन्ट्रॅक्ट,आता झाला खुलासा

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia Bhatt) हे बॉलिवूड स्टार्स 14 एप्रिल रोजी विवाहबंधनात अडकले. तब्बल पाच वर्षं डेटिंग केल्यानंतर अखेर या महिन्यात त्यांचं लग्न झालं. यानंतर त्यांच्या लग्नसमारंभातले बरेच फोटो (Ranbir Alia Wedding pics) समोर येत आहेत. त्यातलाच एक फोटो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 23 एप्रिल- रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia Bhatt) हे बॉलिवूड स्टार्स 14 एप्रिल रोजी विवाहबंधनात अडकले. तब्बल पाच वर्षं डेटिंग केल्यानंतर अखेर या महिन्यात त्यांचं लग्न झालं. यानंतर त्यांच्या लग्नसमारंभातले बरेच फोटो (Ranbir Alia Wedding pics) समोर येत आहेत. त्यातलाच एक फोटो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. या फोटोमध्ये रणबीर आणि लग्नातल्या करवल्या (Bridesmaids) दिसत आहेत. रणबीरने हातामध्ये एक कागद पकडला आहे आणि त्यावर एक प्रकारचा करार लिहिलेला आहे. त्या कागदावर रणबीरची सहीदेखील दिसत आहे.

काय लिहिलंय या करारात?

रणबीरच्या हातात असलेल्या कागदावर ‘मी रणबीर.. आलियाचा पती, सगळ्या करवल्यांना 12 लाख रुपये देण्याचं वचन देतो’ असं लिहिलं आहे. त्यावर खाली रणबीरची सहीदेखील आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Ranbir contract with Bridesmaids) होतो आहे. 'झी न्यूज'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

कशासाठी देणार 12 लाख?

खरं तर लग्नामध्ये करवल्यांनी नवरदेवाचे बूट लपवण्याची परंपरा उत्तर भारतात आहे. करवल्यांनी बूट लपवल्यामुळे नवरदेवाला मंडप सोडून कुठे जाता येत नाही. परिणामी नववधू आणखी थोडा काळ मंडपात राहू शकते. या करवल्या नंतर बूट परत देण्यासाठी नवरदेवाकडे पैशांची मागणी करतात. रणबीरच्या लग्नात देखील आलियाच्या बहिणी आणि मैत्रिणींनी त्याचे बूट लपवून त्याच्याकडे पैशांची मागणी केली. त्यानंतर 12 लाख रुपयांच्या या करारावर (Alia Bhatt Bridesmaids) स्वाक्षरी घेतल्यानंतरच त्यांनी रणबीरचे बूट परत दिले.

रक्कम ठरतेय चर्चेचा विषय

साधारणपणे बूट परत देण्यासाठी करवल्या पाच, 11 किंवा 21 हजार रुपये अशा प्रकारची रक्कम मागतात; मात्र रणबीरच्या लग्नात करवल्यांनी तब्बल 12 लाख रुपयांची मागणी केल्यामुळे ही बाब चर्चेचा विषय ठरत आहे. कित्येक नेटिझन्स या प्रकाराला ट्रोल करत आहेत. एवढ्या पैशांत एखाद्याचं लग्नही होतं, अशा प्रकारच्या कमेंट्सही यावर पाहायला मिळाल्या.

रणबीर-आलियाचं लग्न

पाच वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर 14 एप्रिलला ती दोघं लग्नबंधनात अडकली. त्यांच्या ‘वास्तू’ या घरात त्यांचं लग्न झालं. या लग्नाला केवळ दोन्ही बाजूंचे कुटुंबीय आणि अगदी जवळचे मित्र एवढ्याच व्यक्ती उपस्थित होत्या. लग्नानंतर आलियाने दोघांचे त्या घराच्या बाल्कनीमधले फोटोज पोस्ट केले होते.

रणबीर आणि आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट नऊ सप्टेंबर रोजी (Brahmastra Release date) थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा एक बिगबजेट मायथॉलॉजिकल-सुपरहीरो अशा थीमचा चित्रपट आहे. त्यासोबतच आलियाला एका हॉलिवूडपटाची ऑफरही मिळाली आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Ranbir kapoor