अरबाज नाही तर मलायकानं केलं होतं लग्नासाठी प्रपोज, पण...

अरबाज आणि मलायकाची पहिली भेट 1993मध्ये 'मिस्टर कॉफी' नावाच्या एका ब्रॅन्डच्या जाहीरातीदरम्यान झाली होती.

  • Share this:

बॉलिवूडमध्ये नेहमीच कोणत्या ना कोणत्या कपलच्या अफेअरच्या सुरू असतात. सध्या अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या अफेअरची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र अर्जुनच्या अगोदर मलायकाचं नाव आणखी एका अभिनेत्याशी जोडलं गेलं होतं. तो अभिनेता म्हणजे अरबाज खान. मलायका आणि अरबाजचं फक्त नावच एकमेकांशी जोडलं गेलं नाही तर पहिल्याच नजरेत त्यांना एकमेकांवर प्रेमही झालं होतं.

अरबाज आणि मलायकाची पहिली भेट 1993मध्ये 'मिस्टर कॉफी' नावाच्या एका ब्रॅन्डच्या जाहीरातीदरम्यान झाली होती. पहिल्या भेटीतच हे दोघंही एकमेकांकडे आकर्षित झाले होते. कालांतरानं त्याच्या या भेटीचं रुपांतर मैत्रीत झालं आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात.

जवळपास 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर मलायका आणि अरबाजनं 1998 मध्ये लग्न केलं. या लग्नातही मलायकाची भूमिका मोठी होती कारण, लग्नासाठी अरबाजनं मलायकाला प्रपोज केलं नव्हतं तर मलायकानं अरबाजकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता.

मलायका आणि अरबाज यांचं नातं अनेक वर्ष चांगलं चाललं. या दोघांना अरहान नावाचा एक मुलगाही आहे. पण काही काळानंतर या दोघांमध्ये मतभेद होऊ लागले आणि अखेर 2017मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. अरबाज पासून वेगळं झाल्यानंतर मलायकाचं नावं अर्जुन कपूरशी जोडलं गेलं.

लग्नानंतर मलायका आणि अरबाज यांच्यात सर्वकाही चांगलं चाललं होतं, या दोघांना अरहान नावाचा एक मुलगाही आहे. पण काही काळानंतर या दोघांमध्ये मतभेद होऊ लागले आणि अखेर 2017मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. अरबाज पासून वेगळं झाल्यानंतर मलायकाचं नावं अर्जुन कपूरशी जोडलं गेलं.

अर्जुन आणि मलायका सर्वत्र एकत्र फिरताना दिसतात त्यामुळे त्यांच्या अपेअरच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. पण मलायका किंवा अर्जुननं आपल्या नात्याची कोणतीही जाहीर कबूली अद्याप दिलेली नाही.

अर्जुन आणि मलायका सर्वत्र एकत्र फिरताना दिसतात त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. पण मलायका किंवा अर्जुननं आपल्या नात्याची कोणतीही जाहीर कबूली अद्याप दिलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 23, 2019 09:25 AM IST

ताज्या बातम्या