सलमानच्या 'टायगर जिंदा है'मुळे मराठी 'देवा'ला शोजच नाहीत, मनसे थिएटर्सविरोधात आक्रमक

सलमानच्या 'टायगर जिंदा है'मुळे मराठी 'देवा'ला शोजच नाहीत, मनसे थिएटर्सविरोधात आक्रमक

यशराज फिल्म्सचा आक्रमकपणा असा, की बहुतांश स्क्रीन्स 'टायगर जिंदा है'साठी आरक्षित झालेत. यामुळे मराठी चित्रपट देवाला चित्रपटगृहच मिळत नाहीयेत.

  • Share this:

19 डिसेंबर : मुंबईत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी चित्रपट असा वाद निर्माण होतोय. टायगर जिंदा है आणि देवा हे दोन्ही चित्रपट येत्या २२ तारखेला प्रदर्शित होतायेत. पण यशराज फिल्म्सचा आक्रमकपणा असा, की बहुतांश स्क्रीन्स 'टायगर जिंदा है'साठी आरक्षित झालेत. यामुळे मराठी चित्रपट देवाला चित्रपटगृहच मिळत नाहीयेत. मल्टिप्लेक्समध्ये ही समस्या आहेच, पण खुद्द प्लाझा, चित्रा आणि स्टारसिटीमध्येही देवाला शोज मिळत नाहीयेत. यामध्ये आता मनसेनंही उडी घेतलीये. देवा या चित्रपटाला स्थान द्या, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीनं ती मिळवून देऊ, अशं धमकीवजा पत्रच मनसे चित्रपट सेनेनं काढलंय.

पाहूयात मनसेनं आपल्या पत्रात काय म्हटलंय..

'देवा' x 'टायगर जिंदा है' H

मनसेचं चित्रपटगृहांना पत्र SH

आपण आपले चित्रपटगृह महाराष्ट्राच्या भूमीत चालवता ह्याचा आपल्याला विसर पडला असावा म्हणून हे स्मरणपत्र. हे लिहिताना आम्ही आमच्या भावनांवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु त्या आपल्या एका कृतीमुळे अतिशय दुखावल्या गेल्या आहेत. दिनांक २२ डिसेंबर रोजी इनोव्हेटिव्ह फिल्म्सचा "देवा" हा मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्मात्याचा अथक प्रयत्न चालू आहे. पण "चित्रपटगृह उपलब्ध नाही" असे ठोकळेबाज उत्तर त्याला प्रत्येक ठिकाणी मिळत आहे.

कारण का ? तर त्या दिवशी "टायगर जिंदा है" हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि त्या हिंदी निर्मात्याने आपल्या नावाचा, बळाचा धाक दाखवून सर्वच्या सर्व चित्रपटगृहांवर कब्जा केला आहे. पण मग बाकी निर्मात्यांनी काय करायचे ? कुठे जायचे ? तुम्ही म्हणाल की हा आमचा प्रश्न आहे, आम्ही हवे ते करू. तर मग नीट ऐका. महाराष्ट्राची अस्मिता जपणे आणि मराठी चित्रपटांना त्यांचे हक्क मिळवून देणे हा आमचा प्रश्न आहे आणि तो सोडवण्यासाठी जे हवे ते आम्ही करू.

स्वतः जगा आणि दुसऱ्याला जगू द्या. त्यात दोघांचेही हित आहे. आणि ह्या दोन्ही भाषा तुम्हाला समजत नसतील तर मग आम्हाला आमच्या "खास" भाषेत तुम्हाला समजावून सांगायला लागेल. तेव्हा तुटेल एवढे ताणू नका.

आपला नम्र

अमेय विनोद खोपकर

First published: December 19, 2017, 1:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading