'ब्युटी अँड द बिस्ट'चा एम टीव्ही अॅवाॅर्डनं गौरव

'ब्युटी अँड द बिस्ट'चा एम टीव्ही अॅवाॅर्डनं गौरव

दिग्दर्शक बिल काॅन्डननं लोगन,राऊज वन- ए स्टार वाॅर स्टोरी, गेट आऊट, द एज आॅफ सेवन्टीन या सिनेमांना मात देत ट्राॅफीवर आपलं नाव कोरलं.

  • Share this:

08 मे : एम टीव्ही मुव्ही अँड टीव्ही अॅवाॅर्डस् नुकतेच पार पडले. त्यात 'ब्युटी अँड द बिस्ट' या सिनेमानं सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार पटकावला. दिग्दर्शक बिल काॅन्डननं लोगन,राऊज वन- ए स्टार वाॅर स्टोरी, गेट आऊट, द एज आॅफ सेवन्टीन या सिनेमांना मात देत ट्राॅफीवर आपलं नाव कोरलं.

दिग्दर्शक काॅन्डननं सगळ्यांचे आभार मानले. या सिनेमाला जास्त करून स्त्रियांनी गर्दी केली, असं म्हणून त्यानं स्त्री शक्तीचा जयजयकार केला.

यावेळी ‘कंबाइंड-जेंडर सर्वश्रेष्ठ कलाकार’चा पुरस्कार एमा वाट्सनला दिला गेला.

ह्युग जॅकमन आणि डाफने कीन यांना सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कार दिला.

‘हिडन फिगर्स’ आणि ‘द फेट ऑफ द फ्यूरियस’ यांनी बेस्ट फाइट अगेंस्ट द सिस्टम ट्रॉफी आणि जनरेशन अवार्ड या ट्राॅफी आपल्या नावावर केल्या.

‘स्ट्रेंजर थिंग्स'चाही गौरव झाला.

First published: May 8, 2017, 5:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading