मुंबई, 28 मे- आयुष्य कितीही पुढे निघून गेलं, तरी आयुष्यात मागे वळून बघताना खूप आठवणी पाहायला मिळतात. आणि मग त्या फोटोच्या रुपात असतील तर उत्तमचं. अभिनेत्री (Actress) प्रिया बापटने (Priya Bapat) काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडियावर आपला एक बालपणीचा(Childhood Photo) फोटो शेयर केला होता. यामध्ये ती आपल्या बाबांच्या सोबत दिसून येत होती. या गोड अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो चाहत्यांना खुपचं आवडला होता.
View this post on Instagram
प्रत्येक कलाकार अधून मधून आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत असतो. यासाठी बऱ्याचवेळा ते सोशल मीडियाचा आधार घेत असतात. काहीजण बालपणीच्या आठवणी लिहून व्यक्त करतात. तर काहीजण आपल्या बालपणीचे सुंदर फोटो शेयर करून त्या आठवणीमध्ये रमतात.
View this post on Instagram
मराठीतील प्रसिध्द अभिनेत्री प्रिया बापटने काही दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्रामवर एक सुंदर फोटो शेयर केला होता. हा फोटो तिच्या बालपणीचा होता. त्यामध्ये प्रिया आपल्या वडिलांच्या सोबत दिसून येतेय. प्रियाच्या या फोटोवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या आहेत. तिचा हा क्युट फोटो चाहत्यांना खुपचं पसंत पडला आहे.
(हे वाचा: बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने खरेदी केल नवं घर, किंमत ऐकून व्हाल थक्क )
प्रिया मराठीतील एक उत्कृष्ट अभिनेत्री समजली जाते. प्रियाने आपल्या अभिनयाने चाहत्यांमध्ये आपली एक विशिष्ट ओळख निर्माण केली आहे. प्रियाने सन 2000 मध्ये ‘डॉ. बाबसाहेब आंबेडकर’ या चित्रपटामधून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. तसेच प्रियाने बॉलिवूडमध्ये सुद्धा काम केलं आहे. ती संजय दत्तच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटात झळकली होती.
(हे वाचा:मोठ्या त्रासातून अधिक ताकद..' सुशांतच्या Death Anniversary आधीच रियाची पोस्ट )
फक्त अभिनेत्रीचं नव्हे तर प्रिया एक निर्मातीसुद्धा आहे. तिने ‘दादा एक गुड न्यूज आहे’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आणलं होतं. प्रियाने चित्रपट मालिका,नाटक या सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमठवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment, Priya bapat