Home /News /entertainment /

सेलिब्रिटींचं Honor killing का वाढतंय? कोणाला पतीने झाडली गोळी तर कोणाचा सख्ख्या भावानेच आवळला गळा!

सेलिब्रिटींचं Honor killing का वाढतंय? कोणाला पतीने झाडली गोळी तर कोणाचा सख्ख्या भावानेच आवळला गळा!

बांगलादेशी अभिनेत्री रायमा इस्लाम शिमूचा (Actress Raima Islam Shimu) रस्त्याच्या कडेला मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संशयित म्हणून तिच्या पतीला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, सेलिब्रिटींच्या ऑनरकिलिंगची ही पहिलच घटना नाही. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 19 जानेवारी : बांगलादेशमध्ये (Bangladesh) एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा (Famous Actress) रस्त्याशेजारी असलेल्या गवतात गोणीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात या प्रसिद्ध अभिनेत्रीची निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी संशयित म्हणून तिच्या पतीला ताब्यात घेतलं आहे. गेल्या काही वर्षांत सेलिब्रिटींच्या ऑनरकिलिंगच्या (Honor killing) घटना वाढल्या आहेत. कोणाला सख्ख्या भावाने संपवले, तर कोणाची पतीनेच केली हत्या. अशा घटना होण्यामागचं कारण काय? प्रसिद्धी, पैसा, सत्ता की आणखी काही? आपल्या शेजारील राष्ट्र पाकिस्तानमध्येही अशा काही घटना उघडकीस आल्या आहेत. बांगलादेशच्या अभिनेत्रीची पतीनं केली हत्या? संबंधित मृत अभिनेत्रीचं रायमा इस्लाम शिमू असं नाव आहे. बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका शहरातील एका ब्रिजजवळ तिचा संशयास्पद मृतदेह आढळला आहे. संबंधित परिसरातील काही स्थानिकांना सोमवारी सकाळी कदमटोली क्षेत्रात अलीपूर येथे संशयस्पदरित्या एक गोणी आढळली होती. त्या गोणीतून दुर्गंध येत असल्याने नागरिकांनी तातडीने पोलिसांना त्याबाबत माहिती दिली होती. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत घटनास्थळी तातडीने भेट दिली. पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा गोणीत असणारा मृतदेह हा दुसरा-तिसरा कुणाचा नसून अभिनेत्री रायमा इस्लाम शिमू हिचाच असल्याचं निषपन्न झालं. रायमाचा मृतदेह मिळाल्यानंतर तिचा भाऊ शाहिदुल इस्लाम खोकॉन याने तिचा पती सखावत अमीन नोबोले याच्याविरोधात पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर अभिनेत्रीच्या पतीसह सहा जणांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे या प्रकरणी एका कारलाही जप्त करण्यात आलं आहे. या कारच्या मागच्या सीटमध्ये रक्ताचे डाग आढळले आहेत. तसेच रायमाच्या पतीने आपणच हा गु्न्हा केल्याचं कबूल केल्याचंही वृत्त समोर आलं आहे. घरी येण्यास गायीका रेशमाने दिला नकार, पतीने झाडली गोळी ऑगस्ट 2018 मध्ये पाकिस्तानच्या खैबर पख्तून परिसरात राहणारी रेशमा पश्तो ही रंगमंचावर आपल्या गायकी आणि अभिनयाने सगळ्यांची मन जिंकत होती. तर दुसरीकडे तिचा नवरा फवाद हा पाकिस्तानच्या बाहेर राहून काम होतो. जास्त वेळ घरी येत नसल्याने तो रेशमाच्या कामावर शंका घ्यायचा. तुझं घराकडे लक्ष नसतं असा आरोप तो वारंवार रेशमावर करायचा. घराच्या मुद्द्यावरून त्यांच्यात रोज भांडणं व्हायची. सगळ्यात धक्कादायक म्हणजे फवादच्या 3 बायका होत्या. त्यामुळे रोजच्या या भांडणांमुळे रेशमाने फवादला सोडून दिलं आमणि तिच्या माहेरी राहण्यास गेली. त्यानंतर जेव्हा फवाद घरी आला तेव्हा त्याला हे सगळं प्रकरण समजलं. त्यानंतर फवादने रेशमाला घरी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण हे प्रयत्न फक्त दाखवण्यासाठी होते. खरंतर त्याला रेशमाचा बदला घ्यायचा होता. एकदा तो बंदुक घेऊन रेशमाच्या घरी गेला आणि तिला आपल्यासोबत चलण्याची धमकी दिली. पण रेशमाने फवादसोबत जाण्यास नकार दिला. काही वेळातच त्यांच्यात भांडण सुरू झाली. आणि यातच फवादने त्याच्याकडील बंदुक काढली आणि रेशमा गोळी घातली. यात रेशमाचा जागीच मृत्यू झाला. एकता कपूरचा झाला ब्रेकअप? म्हणाली 'तुम्हाला रुची असेल तर..... ' सोशल मीडिया स्टारचा भावानेत आवळला गळा पाकिस्तानमध्ये (Pakistan) रात्रीतून सोशल मीडिया सेलिब्रिटी (Celebrity) बनलेली कंदील बलोच ऑनर किलिंगची शिकार (Honor Killing) झाली होती. सोशल मीडिया स्टार (Social Media Star) बनलेल्या कंदील बलोचच्या (Qandeel Baloch) हत्या प्रकरणाने पाकिस्तानात खळबळ माजली होती. या हत्येप्रकरणी आरोपी कंदीलच्या भावाला इंटरपोलच्या (Interpol) मदतीने अटक करण्यात आली. पण तुम्हाला कंदील बलोचची संपूर्ण कहाणी माहित आहे का, शाह सदर दिन नावाच्या मागासलेल्या भागात वाढलेल्या फौजिया उर्फ ​​कंदील बलोचने आपल्या स्वप्नांसाठी एका सनातनी समाजासोबत (Orthodox Society) दीर्घ आणि खंडित लढाई कशी लढली? आणि प्रसिद्धीपासून मृत्यूपर्यंतचा प्रवास कसा होता. कंदील 18 वर्षांची होती तिच्या इच्छेविरुद्ध तिचा मेहुणा आशिक हुसैनशी तिचे लग्न लावून दिले. 2008 मध्ये लग्नानंतर कंदील आशिकला तिचा नवरा म्हणून स्वीकारू शकली नाही. भांडणं होत होती, कंदीलची स्वप्ने गुदमरत होती आणि घरगुती हिंसाचार वाढत होता. कुटुंबातील कोणाचाही कंदीलला पाठिंबा नव्हता. 2009 मध्ये कंदील त्या गावातून लहानग्या मीकलसोबत बेपत्ता झाली होती. तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र, बरेच दिवस तिच्याबद्दल काहीही सापडले नाही. आशिकने सांगितले की तो तिची स्वप्ने पूर्ण करू शकत नाही, म्हणून ती स्वतःच्या वेगळ्या वाटेवर गेली. ऑनर किलिंगची कंदील बळी 15 जुलै 2016 रोजी कंदील बलोचची तिचा धाकटा भाऊ वसीम अजीम याने गळा आवळून हत्या केली. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या दुसऱ्या भावावरही हत्येचा आरोप होता. वसीमने सांगितले की, कंदीलमुळे त्याच्या कुटुंबाची इज्जत धोक्यात आली होती, म्हणून त्याने तिची हत्या केली. वसीमला कठोर शिक्षेबद्दल बोलताना कंदीलच्या वडिलांनी आपली मुलगी कंदीलला धाडसी, स्पष्टवक्ता आणि योग्य असे सांगितले. मानवाधिकार कार्यकर्ते, विचारवंत आणि समाजशास्त्रज्ञांनी कंदीलच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. याला पाकिस्तानच्या कट्टर आणि संकुचित समाजाचे दुर्दैव म्हटले गेले.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Actress, Bangladesh, Crime

    पुढील बातम्या