मुंबई, 19 ऑक्टोबर : वेब सीरिज क्विन मिथिला पालकर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. मिथिलाचा बन ठन चली या गाण्यावर डान्स केलेल्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गाण्यात मिथिलासोबत निकोलही दिसत आहे.
मिथिलाने हे गाणं सोशल मीडियावर शेअर करताना लिहिलं आहे की, ही मुलगी रॉकस्टार आहे. हिच्यासोबत हे गाणं केलं आणि अवघ्या 2 दिवसांत पूर्णही झालं. स्टुडिओ, वेशभूषा, कोरिओग्राफी आणि पोहा! आपण हे नियमित करायला हवं निकोल. वेब सीरिजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेल्या मराठमोळ्या मिथिलाने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे.
मिथिलाने 3 दिवसांपूर्वी हा व्हिडीओ इन्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 1.3 मिलिअन लोकांनी पाहिला आहे. वेब सीरिजच्या माध्यमातून लोकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या मिथिलाने इरफान खानसोबत कारवां या चित्रपटातही काम केले आहे. याशिवाय मुरांबा या चित्रपटानेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. आतापर्यंत मिथिलाने गर्ल इन सिटी, लिटील थिंग्ज यांसारख्या वेबसीरिजमध्ये काम केले आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.