News18 Lokmat

Pulwama Attack- ‘आता पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणाऱ्यांवरही बंदी घातली जाईल’

जम्मू- काश्मीरच्या बाहेरून आपण जेवढं नुकसान झालं याचा अंदाज लावू शकतो त्याहून कितीतरी पटीने जास्त नुकसान तिथे झालं.

News18 Lokmat | Updated On: Feb 18, 2019 12:02 PM IST

Pulwama Attack- ‘आता पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणाऱ्यांवरही बंदी घातली जाईल’

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणाऱ्यांचा विरोध सुरू झाला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजचे (FWICE) मुख्य सल्लागार अशोक पंडित म्हणाले की, एफडब्ल्यूआयसीईने जम्मू- काश्मीर मधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पंडित पुढे म्हणाले की, ‘एफडब्ल्यूआयसीई यापुढे पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करण्याचा हट्ट करणाऱ्या निर्मात्यांवरही बंदी घालू शकते, अशी आम्ही अधिकृत घोषणा करत आहोत. पाकिस्तानकडून आपल्यावर वारंवार हल्ले होत आहेत, एवढं असूनही पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करण्याचा हट्ट करणारी काही म्युझिक कंपन्यांना लाज वाटली पाहिजे. आता जर त्यांना लाज नसेल तर आम्हाला त्यांना मागे हटण्याची सक्ती करावी लागेल.’
Loading...
पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून भारतावर हल्ला झाल्यानंतर दरवेळी बॉलिवूडने पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याच्या शपथा घेतल्या. पम थोड्या दिवसांनी ते पुन्हा त्यांच्यासोबत काम करायला सुरुवात करतात. १४ फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यानंतर पंडित जम्मूमध्ये होते. तिथले दृष्य पाहून ते फार अस्वस्थ झाले.

पंडित म्हणाले की, ‘जम्मू- काश्मीरच्या बाहेरून आपण जेवढं नुकसान झालं याचा अंदाज लावू शकतो त्याहून कितीतरी पटीने जास्त नुकसान तिथे झालं. याची भरपाई करण्यात कित्येक वर्ष उलटतील. एक व्यक्ती एवढं स्फोटक सामान घेऊन कश्मीरमध्ये कसा येऊ शकतो? या काळात एकामागोमाग एक दहशतवादी हल्ले झाले. काहीही झालं तरी आता या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत.’ दरम्यान एफडब्ल्यूआयसीई आणि अन्य सिने-टीव्ही उद्योगाच्या २४ संघटनांनी शहीद आणि त्यांच्या परिवारासाठी रविवारी दुपारी २ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत फिल्मसिटीच्या दरवाजातून ‘एकजुटता मार्ग’ काढला.

Pulwama Encounter: भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना घेरले, ग्राऊंडवरून पहिला VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 18, 2019 11:46 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...