मुंबई, 7 डिसेंबर- अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हिने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ (Video) शेअर केला होता. त्या व्हिडिओत तेजस्विनी पंडितने आपल्या ओठावरची लिपस्टिक पुसून काढत बॅन लिपस्टिक (Ban Lipstick) हा नवा ट्रेंड सुरू केला होता. यानंतर सोशल मीडियावर ‘मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही’ असं म्हणत हॅशटॅग बॅन लिपस्टिक हा ट्रेंड तेजस्विनी मुळे खूपच चर्चेत आला. तेजस्विनी पाठोपाठ अभिनेत्री सोनाली खरे, अदिती सारंगधर, स्मिता गोंदकर, प्रजक्ता माळी यांनी देखील हा ट्रेंड सुरू करून तेजस्विनी पंडितला पाठिंबा दर्शवला. मात्र लिपस्टिक पुसण्याचा आणि या ट्रेंडचा नेमका काय संबंध असा प्रश्न सर्वांना पडला होता. आता या व्हिडिओमागचं सत्य समोर आलं आहे.
तेजस्विनीने सोशल मीडियावर पोस्ट करत याचा खुलासा केला आहे. Kill you soon “अनुराधा” या वेबसिरीजचे मोशन पोस्टर शेअर करत तेजस्विनी पंडितने आपल्या आगामी प्रोजक्टची माहिती दिली आहे. अनुराधा ही वेबसीरिज लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वेबसिरीजच्या या मोशन पोस्टरवर लिपस्टिकचं चित्र आहे. Kill you soon अनुराधा या वेब सिरीज धुरा संजय जाधव यांनी सांभाळली आहे. या वेबसिरीजमध्ये कोणकोणते कलाकार झळकणार आहेत याची माहिती समोर आलेली नाही. मात्र ह्या बॅन लिपस्टिकच्या ट्रेंड मागे ज्या अभिनेत्रींनी पाठिंबा दर्शवला होता तेच कलाकार ह्या प्रोजेक्टमधून दिसतील असा अंदाज प्रेक्षकांकडून बांधला जात आहे.
बॅन लिपस्टिक हा ट्रेंड नेमका कोणत्या कारणावरून सुरू झाला आणि लिपस्टिक बॅन करण्यामागे नेमके कारण काय असा प्रश्न प्रेक्षकाना पडला होता. यावेळी अनेकांनी हा पब्लिसिटी स्टंट असावा असा अंदाज बांधला होता तर अनेकांनी तिच्या आगामी प्रोजेक्ट बाबत शक्यता वर्तवली होती. बॅन लिपस्टिक मागे नेमके कोणते कारण आहे याचा उलगडा आता झालेला आहे.
View this post on Instagram
बॅन लिपस्टिकमागे अनुराधाचे काय कनेक्शन आहे याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे ही सीरिज नेमकी काय संदेश देणार आहे याची उलगडा सीरिड पाहिल्यानंतरच होणार आहे. मात्र या ट्रेंडमुळे या सीरिजची चांगलीच प्रसिद्धी झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.