मुंबई, 11 डिसेंबर: अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हिने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ (Video) शेअर केला होता. त्या व्हिडिओत तेजस्विनी पंडितने आपल्या ओठावरची लिपस्टिक पुसून काढत बॅन लिपस्टिक (Ban Lipstick) हा नवा ट्रेंड सुरू केला होता. यानंतर सोशल मीडियावर ‘मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही’ असं म्हणत हॅशटॅग बॅन लिपस्टिक हा ट्रेंड तेजस्विनी मुळे खूपच चर्चेत आला. तेजस्विनी पाठोपाठ अभिनेत्री सोनाली खरे, अदिती सारंगधर, स्मिता गोंदकर, प्रजक्ता माळी यांनी देखील हा ट्रेंड सुरू करून तेजस्विनी पंडितला पाठिंबा दर्शवला. मात्र लिपस्टिक पुसण्याचा आणि या ट्रेंडचा नेमका काय संबंध असा प्रश्न सर्वांना पडला होता. हे नक्की काय प्रकरण आहे, याची सर्वत्र चर्चा रंगली होती. अभिनेत्रींच्या या अशा व्हिडीओमुळे लोकांच्या मनात संभ्रम आणि उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर याचा उलगडा झाला असून त्याचे कारण समोर आले आहे. संजय जाधव दिग्दर्शित 'अनुराधा' (Anradha) ही 7 भागांची वेबसिरीज 'प्लॅनेट मराठी ओटीटी', व्हिस्टास मीडिया कॅपिटलवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आणि त्याच्याच प्रमोशनचा हा एक भाग होता.
नुकताच या वेबसिरीजच्या पोस्टर आणि टिझर प्रदर्शित झाला आहे. टिझरमध्ये तेजस्विनीचा वेगळा अंदात पाहायमला मिलत आहे. ती प्रत्येकवेली वेगळ्या भूमिकेत या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तेजस्विनीचा बोल्ड अंदाज मात्र लक्षवेधून घेत आहे.यामग नेमके कारण काय आहे, हे या वेबसिरीजमधून समोर येईल.
वाचा :राखीने पती रितेशसोबत प्रेक्षकांना मूर्खात काढलं? नेटकऱ्यांनी सत्य आणलं समोर
'अनुराधा’या वेबसीरिजमध्ये तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, सुकन्या कुलकर्णी मोने, सचित पाटील, सुशांत शेलार, विद्याधर जोशी, स्नेहलता वसईकर, संजय खापरे, आस्ताद काळे, विजय आंदळकर, चिन्मय शिंत्रे, वृषाली चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.'अनुराधा’च्या निमित्ताने संजय जाधव वेबसीरिजच्या विश्वात पदार्पण करत असून हिरालाल दाफडा आणि आकाश दाफडा यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. या वेबसीरिजचे लेखन संजय जाधव, वैभव चिंचळकर यांचे असून पंकज पडघम यांचे संगीत लाभले आहे. तर संकलनाचे काम अपूर्वा मोतीवाले सहाय यांनी पाहिले असून कला दिग्दर्शक सतीश चिपकर आहेत.
बॅन लिपस्टिक हा ट्रेंड नेमका कोणत्या कारणावरून सुरू झाला आणि लिपस्टिक बॅन करण्यामागे नेमके कारण काय असा प्रश्न प्रेक्षकाना पडला होता. यावेळी अनेकांनी हा पब्लिसिटी स्टंट असावा असा अंदाज बांधला होता तर अनेकांनी तिच्या आगामी प्रोजेक्ट बाबत शक्यता वर्तवली होती. बॅन लिपस्टिक मागे नेमके कोणते कारण आहे याचा उलगडा आता झालेला आहे. तसेच बॅन लिपस्टिक आणि अनुराधाचं काय कनेक्शन आहे हे वेबसीरिज पाहिल्यानंतर लक्षात येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, TV serials