आता Laxmmi Bomb बॅन करण्याची मागणी; खिलाडी अक्षय कुमारचा एक VIDEO पडला भारी

आता Laxmmi Bomb बॅन करण्याची मागणी;  खिलाडी अक्षय कुमारचा एक VIDEO पडला भारी

आतापर्यंत स्टार किड्सच्या फिल्मवर बहिष्कार टाकला जात होता मात्र आता अभिनेता अक्षय कुमारची (akshay kumar) फिल्मही बॅन करण्याची मागणी होऊ लागली. #BanLaxmiBomb ट्रेंड होऊ लागला.

  • Share this:

मुंबई, 05 ऑक्टोबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमवरून वाद सुरू झाला. स्टार किड्सच्या रिलीज होणाऱ्या फिल्मला सोशल मीडियावर विरोध होऊ लागला. या फिल्म्स बॅन करण्याची मागणी जोर धरू लागली. मात्र आता अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) फिल्मलाही विरोध होऊ लागला आहे. लक्ष्मी बॉम्ब बॅन (Laxmmi Bomb) करण्याची मागणी होऊ लागली आहे. #BanLaxmiBomb ट्रेंड होऊ लागला.

अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब बॅन करण्याची मागणी होऊ लागली, याचं कारण म्हणजे अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वीच ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण आणि बॉलिवूडमधील ड्रग्जबाबत त्याने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. त्याची हीच प्रतिक्रिया त्याला आता भारी पडली आहे.

अक्षय कुमारने बॉलिवूडमध्ये ड्रग्जची समस्या असल्याचं सांगितलं होतं. मात्र बॉलिवूडसंबंधी प्रत्येक व्यक्ती यामध्ये सहभागी असेल असं नाही असं त्याने म्हटलं. यानंतर अनेक सेलिब्रिटींनी अक्षय कुमारला समर्थन दिलं. यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या मनातून अक्षय उतरू लागला. सोशल मीडियावर लक्ष्मी बॉम्ब बॅन करण्याची मागणी त्यांनी केली.

अक्षय या व्हिडीओत म्हणाला, "सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अनेक गोष्टी समोर आल्या. ज्यामुळे तुम्हाला जितक्या वेदना झाल्या तितक्या वेदना आम्हालाही झाल्या. फिल्म इंडस्ट्रीतील अशा अनेक गोष्टींकडे आज आमचं लक्ष वळवलं जिकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जसं सध्या ड्रग्जबाबत चर्चा सुरू आहे. मी याबाबत कसं खोटं बोलू की बॉलिवूडमध्ये ड्रग्ज नाहीच, जरूर आहे. जसं प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये असतं तसंच. मात्र प्रत्येक इंडस्ट्रीतील प्रत्येक व्यक्तीचा याच्याशी संबंध असणं गरजेचं नाही"

हे वाचा - "मी खोटं कसं बोलू पण...", बॉलिवूडमधील ड्रग्जबाबत अक्षय कुमारने VIDEO तून केला खुलासा

"ड्रग्ज प्रकरण ही कायदेशीर बाब आहे आणि आपल्या तपास यंत्रणा जो काही तपास करतील तो योग्य असेल आणि या तपासात फिल्म इंडस्ट्रीतील प्रत्येक व्यक्ती तपास यंत्रणेला पूर्णपणे मदत करेल, असा मला विश्वास आहे. पण तुम्हाला हात जोडून विनंती करतो. असं नका करू. पूर्ण इंडस्ट्रीला वाईट म्हणू नका. हे चुकीचं आहे ना", असं अक्षय म्हणाला. अक्षयचा हाच व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वसामान्यांना संताप अनावर झाला. त्यांनी अक्षयलाही लक्ष्य केलं.

लक्ष्मी बॉम्ब (Laxmmi Bomb) 9 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा भारत, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूएईमध्ये प्रदर्शित होतोय. OTT प्लॅटफॉर्म हॉट स्टारवर (Hot Star) हा सिनेमा रिलीज होणार आहे. अक्षय कुमार (Akshay kumar new movie) या चित्रपटात ट्रान्स जेंडरची भूमिका साकारत आहे.‘कंचना 2’ या तामिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असल्याचं म्हटलं जात आहे. अक्षयच्या या भूमिकेचं नाव लक्ष्मी असं आहे.

हे वाचा - "सुशांतची हत्या झाली होती"; AIIMS च्या डॉक्टरांची AUDIO CLIP लीक

अक्षय कुमारसोबतच (Akshay Kumar) कियारा अडवाणी (Kiara Advani), तुषार कपूर (Tushar Kapoor), शरद केळकर (Sharad Kelkar) असे दिग्गज कलाकार या सिनेमामध्ये झळकणार आहेत. या सिनेमात काम करण्यासाठी कलाकारांनी तगडं मानधन घेतलं असल्याची माहिती मिळत आहे. लक्ष्मी बॉम्बनंतर रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी या सिनेमामध्ये अक्षय कुमार झळकणार आहे. त्यासोबतच पुढील वर्षात हेराफेरी 3, अतरंगी रे, बच्चन पांडे, बेल बॉटम ह्या चित्रपटातही अक्षय दिसणार आहे.

Published by: Priya Lad
First published: October 5, 2020, 3:19 PM IST

ताज्या बातम्या